3 May 2025 9:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

दिल्ली: कोरोनाबळींची संख्या वाढल्याने स्मशानभूमीसाठी अतिरिक्त जागेचा शोध सुरु

Delhi, Corona Death Increased

नवी दिल्ली, १७ जून: देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २००३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख ८६ हजार ९३५ झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ११ हजार ९०३ झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर २.९% वरून ३.४ झाला आहे.

दुसरीकडे राजधानी दिल्लीत कोरोनाच्या मृतांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी अतिरिक्त जागा शोधून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मृतदेहांवर वेळेत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानंतर स्मशानभूमीसाठी आणि कब्रस्थानासाठी जागा कमी पडत असल्याने ती शोधण्याचा आदेश दिल्ली सरकारने चार जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पर्यायी जागांचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. यात काही ठिकाणी सापडलेल्या जागा जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला सुचवल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २९.५ टक्के वाढ झाली आहे.

 

News English Summary: The Delhi government has directed the district collectors of all the districts to look for additional places for cemeteries and crematoriums as the death toll in the corona is likely to rise in the capital.

News English Title: Delhi government has directed the district collectors of all the districts to look for additional places for corona is likely to rise in the capital News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या