ती मिठी इस्रोने 'अदानी डिफेन्स’ला २७ सॅटेलाईटचं कंत्राट दिल्यामुळे होती: सविस्तर
मुंबई : मागील काही दिवसांपासून चांद्रयान २ अयशस्वी ठरल्यानंतर देशातील वातावरण शास्त्रज्ञांच्या बाबतीत पहिल्यांदाच भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील फोटो मिळणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असताना देखील मागील काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये वातावरण तापत ठेवण्यात आलं आहे. त्यात थेट तामिळनाडूमध्ये इस्रोचे अध्यक्ष डॉ.सिवन यांचे विशेष मुलाखतीचे कार्यक्रम आखून त्यातून देखील भावनिक बातम्या पेरल्या जात असून, त्यात सिवन यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याची वेगळीच व्यूहरचना आखली गेल्याच सध्या समोर येताना दिसत आहे. त्यातही काही ठराविक माध्यम सोडल्यास सर्वच सरकारी रणनीतीत सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मोदी सरकारच्या बाबतीत मागील काही वर्षांपासूनच्या रणनीतीचा अभ्यास केल्यास त्यात सामील होणाऱ्या सरकार संबधित अराजकीय व्यक्तींना नियोजनबद्ध मोठं करण्यात आलं आहे आणि त्यामागील वास्तव वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. मात्र यात भावनिक विषयावर अधिक भर असतो, म्हणजे लष्कर आणि वैज्ञानिक हे भारतातील लोकांचे भावनिक विषय आहेत याची नस भाजपच्या धुरंदर राजकारणी लोकांनी अचूक ओळखली आहे. भारतीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्याबाबतीत देखील हीच रणनीती आखण्यात आली होती. आज त्यांना मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त असून त्यांचा मुलगा देखील भाजपचा थिंक टॅंक समजला जातो. मात्र त्याबाबतीत असं काही भावनिक वातावरण केलं आहे की विरोधकांनी काहीही विषय किंवा शंका उपस्थित केल्यास त्यांना थेट लोकांकडूनच नकारात्मक प्रतिकिया मिळतात आणि तोच भाजपच्या भावनिक वातावरण निर्मितीचा विजय आहे. कारण लोकांना भाजपच्या राजकीय रणनीतीचे फंडेच कळत नसतात.
तसाच प्रकार आणि रणनीती सध्या इस्रोचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सिवन यांच्या बाबतीत आखली गेली आहे असंच म्हणावं लागेल. वास्तविक इस्रोचे चांद्रयान १ मिशन जे २००८ मध्ये यशस्वी झालं होतं याचाच भारतीयांना विसर पडला आहे. चांद्रयान २ नाव असेल तर चांद्रयान १ म्हणजे काय असा साधा विचार न करण्याइतके भारतीय मेंदू सध्या भलत्याच गर्तेत अडकले आहेत. त्यात मोदींचे मुख्य लक्ष असतात फस्ट टाईम वोटर्स आणि तेच २००८ मध्ये लहान होते, मात्र २०१९ मध्ये १८ वर्षाचे झाले असल्याने त्यांना मोदींच्या काळातील शास्त्रज्ञांचं महत्व पटलं आहे. त्यासाठी एंक शाळांमध्ये मुलांना या चांद्रयान २ या विषयांवर केंद्रित केलं गेलं आहे.
आता डॉ. सिवन यांना मोदी आतमध्येच मिठी देऊ शकले असते, मात्र तसं करतील तर ते मोदी कसले. त्यासाठी आधी मोदी बाहेर आले आणि प्रसार माध्यमांचे कॅमेरे समोर असल्याची खात्री पटताच सिवन या एका वैद्यानिकाला मिठीत घेऊन बराचवेळ लहान मुलासारख कुरवाळलं. त्यानंतर सर्वप्रकार प्रसार माध्यमांनी कॅमेरे झुम करत रेकॉर्ड केल्याची खात्री पटल्यावरच डॉ. सिवन यांना मिठीतुन मुक्त केलं हे देशाने पाहिलं आणि पुढील स्क्रिप्ट अनेक माध्यमांकडे आधीच तयार होती आणि त्याप्रमाणे देशभर भावनिक वातावरण निर्मिती करण्यात मोदी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं.
शनिवारी सकाळी ‘इस्त्रो’चा विक्रम लँडरचा तुटलेला संपर्क तमाम भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. परंतु त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले शास्त्रज्ञांचे सांत्वन आणि ‘इस्त्रो’ प्रमुख डॉ.के.सिवन यांना मारलेली करकचून मिठी यामुळे भारतीय जनता भारावली. परंतु ही मिठी शास्त्रज्ञाचे मनोबल उंचावण्यासाठी नव्हती. तर डॉ.सिवन यांनी तब्बल २७ अंतराळ उपग्रह (सॅटेलाईट) बनविण्याचे कंत्राट मोदींचे परममित्र उद्योगपती अदानींना दिल्यामुळे होती. आणि हा प्रकार देशासाठी भयंकर आहे याची कोणालाही जाण नाही. उद्या डॉ.सिवन यात अडकू नये म्हणून आधीच त्यांच्यासाठी नियोजनबद्ध भावनिक वातावरण तयार करण्यात आलं आहे, जणूकाही ते इस्रोचे पहिलेच यशस्वी शास्त्रज्ञ असावेत.
‘इस्त्रो’ने मोठ्या संख्येने सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट उद्योगपती अदानींच्या ‘अदानी डिफेन्स सिस्टम अँड टेक्नॉलॉजीस लिमिटेड’ म्हणजे पुर्वीची ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’, तसेच ‘भारत इलेक्ट्रॉनिक’ आणि ‘टाटा अॅडव्हान्स’ या कंपन्यांना दिले आहे. त्यापैकी तब्बल २७ सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट एकट्या ‘अल्फा डिझाईन्स’ म्हणजेच ‘अदानी डिफेन्स’ कंपनीला मिळाले आहे, ज्या कंपनीची स्थापना २५ मार्च २०१५ मध्ये करण्यात आली होती. वास्तविक ‘इस्त्रो’ ही अंतराळ संशोधन संस्था हे सॅटेलाईट बनविण्यासाठी कार्यक्षम असताना आणि ‘इस्त्रो’ने यापूर्वी भारताच्या अंतराळ मोहिमासाठी सॅटेलाईट बनविले असताना खासगी कंपन्यांना सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट देणे हे देशाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे. तसेच भारताच्या अंतराळ मोहिमांच्या सुरक्षिततेला धोकादायक आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमाने तयार केलेल्या तंत्रज्ञानाची गोपनीय माहिती खासगी कंपन्यांच्या हाती देण्याचा हा देशद्रोहीपणा आहे. हे देशाच्या अंतराळ संशोधनाच्या गोपनीय माहितीसाठी धोकादायक आहे.
परंतु ‘इस्त्रो’ प्रमुख डॉ.के.सिवन यांनी पंतप्रधान मोदींच्या अदानी प्रेमाखातर केले. तसे करताना अनेक देशविघातक गोष्टींना त्यांनी खत पाणी घातलं असून त्यांनी थेट देशाच्या गोपनीय गोष्टीच या बलाढ्य लोकांच्या हाती दिल्या आहेत असं तज्ज्ञांना वाटत आहे. सर्वप्रथम जगभरात ‘काळ्या यादीत’ असलेल्या ‘अल्फा डिझाईन्स’ या इटालियन कंपनीला सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिले. ‘पनामा’च्या जाहीर झालेल्या भ्रष्टाचार्यांच्या यादीतही ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’चे नाव आहे. तसेच इटालियन सरकारचा या ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’ कंपनीवर राग असतानाही ‘इस्त्रो’ने या कंपनीला कंत्राट दिले. या व्यवहारामागे मोदींचे अदानी प्रेम आहे.
२०१८ मध्ये ‘इस्त्रो’ने ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’ कंपनीला २७ सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट दिले आणि लगोलग २०१९ मध्ये उद्योगपती गौतम अदानी यांनी ही कंपनी अवघ्या ४०० कोटी रुपयांना विकत घेतली. म्हणजे ही कंपनी अदानी विकत घेणार हे माहीत असल्यानेच त्या कंपनीला २७ सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट देण्यात आले. हा काही योगायोग नाही तर ‘सोची समझी चाल’ होती. जगभरात गाजलेल्या ‘पनामा’ प्रकरणात देखील या कंपनीचे नाव आहे. ‘अल्फा डिझाईन्स लिमिटेड’वर भ्रष्टाचाराचे मजबूत आरोप लावण्यात आले होते. अशा या बदनाम व नितिमत्ता नसलेल्या कंपनीच्या हाती भारताचे अंतराळ संशोधन सोपविण्याचे देशविघातक कृत्य ‘इस्त्रो’ प्रमुख के. सिवन यांच्या हातून घडले आहे किंवा मोदी सरकारने त्यांच्याकडून करवून घेतले आहे.
हे सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यापूर्वी तपन मिश्रा या अंतराळ शास्त्रज्ञाचा बळी देण्यात आला. तपन मिश्रा हे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. डॉ.सिवन यांच्यानंतर तपन मिश्रा हेच ‘इस्त्रो’चे प्रमुख होणार होते. त्यांनी भारताचे अंतराळ सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना द्यायला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी तपन मिश्रा हे इस्त्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे डायरेक्टर होते. तपन मिश्रा यांनी सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना द्यायला विरोध करताच ‘इस्त्रो’ प्रमुख डॉ.सिवन यांनी त्यांची स्पेस डायरेक्टरच्या पदावरून उचलबांगडी करून त्यांची ‘इस्त्रो’च्या मुख्यालयात सल्लागारपदी नियुक्ती केली. याचा अर्थ तपन मिश्रा हे ‘इस्त्रो’च्या अंतराळ कार्यक्रम राबविणार्या मुख्य शास्त्रज्ञांमध्ये नसून फक्त सल्ला द्यायच्या समितीत आहेत.
ज्यांचे फक्त कामच बोलते अशा तपन मिश्रा या निष्णांत अंतराळ शास्त्रज्ञाने फक्त सॅटेलाईट बनविण्याचे कंत्राट खासगी कंपनीला द्यायला दीड वर्षांपूर्वी विरोध केला म्हणून तपन मिश्रांना अडगळीत टाकून शास्त्रज्ञ म्हणून संपविण्याचा भयानक प्रकार डॉ.के.सिवन यांनी केला आहे. सध्या ‘चांद्रयान २’ मोहिमेमुळे डॉ.सिवन यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु त्यांची ही देशविघातक बाजू देशासमोर येणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC