20 August 2022 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पुणे-सातारा रस्त्याच काम रखडविणाऱ्या 'रिलायन्सला' टोलवाढीची भेट

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ पुणे (देहूरोड)- सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं केवळ अडीज वर्षाचं काम तब्बल साडेसात वर्ष रखडलेलं असताना देखील उलट सरकारच त्यांना वेळोवेळी मुदतवाढ करून देत होती आणि आता त्या दिरंगाईचा सरकारी नजराणा म्हणून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

येत्या एप्रिलपासून या रस्त्यावरील खेडशिवापूर ते आणेवाडी टोलनाक्यावरील टोलच्या दरात वाढ केली जाणार असून ही रोजच्या प्रवाश्यांना वाईट बातमी आहे. ज्या ठेकेदाराला स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काळ्या यादीत शामिल करण्याचं भाष्य केलं होतं, परंतु पुन्हा रिलायन्सला वेळोवेळी सूट मिळत गेली आहे आणि इतकेच नाही तर ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला टोलवाढीची भेट सरकारकडून देण्यात आली आहे.

वास्तविक या १०४ किलोमीटर रस्त्याचं काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु झाले होते जे मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे सजग नागरिक मंचच्या वतीने माहितीच्या अधिकारात विवेक वेलणकर यांनी वेळोवेळी या कामाच्या प्रगती बाबत माहिती अधिकारात सरकारकडून तपशील मागवला. त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीत त्या रस्त्याच्या कामाबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर दिरंगाई करत असल्याचे उघड झाले आहे.

१४ ऑगस्ट २०१६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी पुणे सातारा रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी अशा दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला होता परंतु तशी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

विवेक वेलणकर म्हणाले की जर काम वेळेत होत नसेल तर टोल बंद झाला पाहिजे. परंतु इथे उलट दिरंगाईच ‘टोलवाढ’ हे बक्षिसच सरकारने ठेकेदार कंपनीला दिले आहे.

हॅशटॅग्स

#Toll Cha Zol(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x