2 July 2020 10:41 AM
अँप डाउनलोड

गेल्या २४ तासांत देशात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; ३७५ जणांचा मृत्यू

Corona Virus, Covid 19, India

नवी दिल्ली, २० जून : मागील २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल १४ हजार ५१६ नवे रुग्ण आढळेल आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या एका दिवसातील संख्यने आतापर्यांतच मोठा उच्चांक गाठल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहचली आहे. तसंच एका दिवसात ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

देशभरातील एकूण करोनाबाधितांपैकी १ लाख ६८ हजार २६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख १३ हजार ८३१ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत देशात करोनामुळे एकूण १२ हजार ९४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, असं असलं तरी, देशात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५३.७९ टक्के इतकं आहे. तसंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्याने वाढत असून उपचाराधीन व बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील फरकही वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात जे धोरण अवलंबण्यात आलं ते परिणामकारक असल्याचं दिसतं, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं.

 

News English Summary: In the last 24 hours, 14 thousand 516 new cases of corona have been found in the country. The number of corona patients in the country has reached a record high in a single day. As a result, the total number of corona victims in the country has reached 3 lakh 95 thousand 48.

News English Title: In the last 24 hours 14 thousand 516 new cases of corona have been found in the country News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(952)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x