22 September 2019 2:09 PM
अँप डाउनलोड

सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही; माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास संतापले

Yogi Adityanath, Narendra Modi, Indian Army, Loksabha Election 2019

लखनौ : माजी नौदल प्रमुख ऍडमिरल एल. रामदास यांनी युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना चांगलेच झाडाले आहे. देशाचं सैन्य कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे रामदास यांनी ध्यानात आणून दिले आहे. आदित्यनाथ यांनी एका सभेदरम्यान सैन्याचा उल्लेख “मोदीजी की सेना” असा उल्लेख करत सैन्याच्या राजकीय वापर करणाचा प्रयत्न केला होता. त्यावर संतापलेल्या माजी नौदल प्रमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे एल. रामदास यांनी स्वतः आदित्यानाथ यांच्या संबंधित वक्तव्याविरोधात भारतीय निवडणूक आयोगाला लेखी पत्र लिहून तक्रारही केली आहे. सदर पत्रात त्यांनी म्हटले आहे, “सैन्यदल कुणाची खासगी शक्ती नाही आणि त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधही नाही. अशा प्रकारची वक्तव्य अस्विकार्य आहेत. त्यांनी हे पत्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना लिहिले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३० मार्चला गाजियाबाद येथे पक्षाच्या निवडणूक प्रचारसभेत भारतीय सैन्याला ‘मोदी जी की सेना’ म्हटले होते. ते गाजियाबादमधून उमेदवार असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जनरल व्ही. के. सिंह यांचा प्रचार करत होते. आपल्या भाषणात आदित्यनाथ म्हणाले, “काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालतात. मात्र, आता नरेंद्र मोदीजींची सेना त्यांना फक्त गोळी देते. भारतीय सैन्याला ‘मोदी की सेना’ म्हटल्यावर अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Narendra Modi(980)#Yogi Government(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या