27 July 2021 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Unlock 5.0 | सणासुदीच्या काळात ३९२ विशेष गाड्या धावणार

Indian railways, Trains IRCTC, Festival special trains

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर : ऑक्टोबर महिन्यातील आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने 392 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन (festival special trains) या नावाने सर्व गाड्या धावणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सणासुदीच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेने सर्व विभागांत (Zonal Railways) उत्सव विशेष गाड्या (फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन) चालविण्यास मंजुरी दिली दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अतिरिक्त सुविधा आणि गर्दीपासून दिलासा मिळणार आहे.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवल्या जातील. भारतीय रेल्वेने सर्व रेल्वे परिमंडळांना या स्पेशल गाड्या चालविण्यास परवानगी दिली आहे. यात काही गाड्या नियमित धावतील तर काही आठवड्यात तीन दिवस किंवा चार दिवस धावणार आहेत. याशिवाय साप्ताहिक गाड्याही धावणार आहे.

 

News English Summary: The Railways on Tuesday announced it has given approval to run 392 ‘Festival special’ between October 20 and November 30 to cater to the big festive season rush. The fares for these trains will be according to those applicable for special trains, the railways ministry said. It means that ‘special charges’ will be levied, making the tickets costlier by 10-30 per cent as compared to the fares of Mail/Express trains, depending on the class of travel.

News English Title: Indian railways will run 196 pairs of special trains IRCTC zonal railways will operated 392 festival special trains till 30 November News updates.

हॅशटॅग्स

#railway(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x