26 July 2021 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

एमपीत २८ जागांवर पोटनिवडणूक | भाजपची मोफत कोरोना लसची घोषणा | खरं कारण वाचा

Madhya Pradesh CM Shivraj Singh, Bypoll, Free Of Cost Corona Vaccine

भोपाळ, २२ ऑक्टोबर : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला करोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प’ यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु ही लस येताच ती मोठ्या प्रमाणात भारतात तयार होईल. ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलं आहे.

दुसरीकडे तशीच घोषणा मध्य प्रदेशातील शिवराजसिंग सरकारने देखील केली आहे. मध्य प्रदेशमध्ये कोरोनाची लस आल्यानंतर ती मध्यप्रदेशच्या जनतेला मोफत देणार अशी मोठी घोषणा आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. ज्यावेळी करोनाची लस येईल त्यावेळी ती मध्यप्रदेशच्या जनतेला मोफत देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे.

मात्र मध्य प्रदेशातील या घोषणे मागील खरं कारण दुसरंच असल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या तब्बल २८ जागांवर पोटनिवडणूक होतं असून त्यासाठी ३ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशातील २०१८ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संबंधित २८ जागांपैकी २७ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपाची धाकधूक वाढली होती. त्यामुळे कोरोना आपत्ती संबंधित कोरोना लसचा मुद्दा पुढे करून मतदाराला एकप्रकारे घाईघाईत आमिष दाखवल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan on Thursday further ramped up the Bharatiya Janata Party (BJP)’s recent rhetoric over the coronavirus disease (COVID-19) vaccine, declaring that once the vaccine is ready, it will be made available for everyone in Madhya Pradesh free of cost. The chief minister on this day took to his official handle on Twitter to announce the news.

News English Title: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan Announces That As And When A Covid19 Vaccine Is Ready It Will Be Made Available Free Of Cost news updates.

हॅशटॅग्स

#MadhyaPradesh(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x