24 April 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

भारतातील हिंदु, मुस्लिमांचे पूर्वज एकच | मोहन भागवत यांचं वक्तव्य

Mohan Bhagwat

नागपूर, ०७ सप्टेंबर | हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच होते आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा ‘हिंदू’ आहे’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले. ते ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या ‘राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी’ या कार्यक्रमात बोलत होते.

भारतातील हिंदु, मुस्लिमांचे पूर्वज एकच, मोहन भागवत यांचं वक्तव्य – Muslims are alike we have to think not of communal supremacy but of Indias supremacy said Mohan Bhagwat :

समंजस’ मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. भारतातील अल्पसंख्याक समुदायाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. कारण हिंदू कोणाशीही वैर करत नाहीत’, असेही मोहम भागवत म्हणाले.

हिंदू हा शब्द मातृभूमी, पूर्वज आणि भारतीय संस्कृतीच्या बरोबरीचा आहे. हा इतर विचारांचा अनादर नाही. आपल्याला मुस्लिम वर्चस्वाबद्दल नाही तर भारतीय वर्चस्वाबद्दल विचार करावा लागेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे”, असेही मोहन भागवत म्हणाले.

मुस्लिम नेत्यांनी अतिरेक्यांना विरोध केला पाहिजे:
भागवत”इस्लाम आक्रमकांसह भारतात आला. हा इतिहास आहे आणि त्याच प्रकारे सांगितला पाहिजे. सुज्ञ मुस्लिम नेत्यांनी अनावश्यक मुद्द्यांना विरोध केला पाहिजे. अतिरेकी आणि अतिरेक्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. जितक्या लवकर आपण हे करू, तितके समाजाचे कमी नुकसान होईल”, असे आवाहन भागवत यांनी केले.

भारत कोणालाही धमकावणार नाही:
महासत्ता म्हणून भारत कोणालाही धमकावणार नाही. हिंदू हा शब्द आपल्या मातृभूमी, पूर्वज आणि संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा समानार्थी आहे. या संदर्भात प्रत्येक भारतीय आपल्यासाठी हिंदू आहे. मग तो त्याच्या धार्मिक, भाषिक आणि वांशिक असो. हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज समान आहेत. भारतीय संस्कृती विविध विचारांना सामावून घेते आणि इतर धर्मांचा आदर करते”, असे मोहन भागवत ‘राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी’ या परिसंवादात म्हणाले.

या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरचे कुलपती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनीही उपस्थिती लावली. खान म्हणाले, की ‘अधिक विविधता समृद्ध समाजाकडे जाते. भारतीय संस्कृती प्रत्येकाला समानतेने वागवते’.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Muslims are alike we have to think not of communal supremacy but of Indias supremacy said Mohan Bhagwat.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x