2 May 2025 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान शूटिंगमध्ये व्यस्त होते | नक्षली हल्ल्यानंतर प्रचारात व्यस्त आहेत - रुपाली चाकणकर

NCP leader Rupali Chakankar, PM Narendra Modi, Indian soldiers, Naxal attacked, Chhattisgarh

पुणे, ०४ एप्रिल: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीत तब्बल २२ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ ने दिलेल्या वृत्तानुसार, काल चकमक झाली त्याच परिसरात आणखी 14 जवानांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे आता या नक्षलवादी चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांचा आकडा 22 वर पोहोचला आहे.

काल शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांची बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक उडाली होती. तब्बल ३ तास याठिकाणी जोरदार धुमश्चक्री सुरु होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. मात्र, आता 21 पैकी 14 जवान मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित सात जवानांचा शोध अजूनही सुरु आहे. काल या चकमकीत 8 जवान शहीद झाले होते. तर 24 जवान जखमी झाले होते. यापैकी 7 जवानांची प्रकृती गंभीर आहे.

या गंभीर घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुलवामा घटनेनंतरच्या विषयाला उजाळा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, “पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले असताना देशाचे पंतप्रधान जंगलात स्वतःचं शूटिंग करण्यात व्यस्त होते. आज नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद झालेत, आजही पंतप्रधान प्रचारात व्यस्त आहेत. आपण “पंतप्रधान” निवडले आहेत की “प्रचारप्रधान” तेच कळत नाही.”

 

News English Summary: As many as 22 soldiers have been killed in a Naxal encounter in Bijapur, Chhattisgarh. According to ANI, the bodies of 14 more soldiers were found in the same area where the clash took place yesterday. So now the number of Indian soldiers martyred in this Naxalite encounter has reached 22.

News English Title: NCP leader Rupali Chakankar criticized PM Narendra Modi after 22 Indian soldiers killed in Naxal attacked in Chhattisgarh state news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या