13 October 2024 4:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest | 5 वर्षांसाठी केलेली FD 1 वर्षातच तोडायची असल्यास व्याज मिळेल की उलट पैसे कापले जातील No Cost EMI | नो कॉस्ट EMI खरंच फायद्याचा असतो, खरंच फ्री सुविधा मिळते का, असा असतो खेळ - Marathi News Nippon India Small Cap Fund | बापरे, महिना रु.10,000 SIP करा, ही योजना 1 कोटी 53 लाख रुपये परतावा देईल - Marathi News TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS Manmauji Movie Release Date | एका तरुणासाठी स्त्रियांना झालंय प्रेमाचं लागीर, 'मनमौजी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर IREDA Share Price | PSU IREDA शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | डिफेंस क्षेत्रातील शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

एकाला ४२० मतं; पवारांना दिल्लीत कोणीही गांभीर्याने घेतलं नाही, पवार सांगायला विसरले?

NCP, Sharad Pawar, Delhi Assembly Election 2020

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

“काही लोक राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला येतात. तर काही राज ठाकरेंना पाहायला येतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाला गर्दी होते”, असा चिमटा शरद पवार यांनी काढला. शरद पवारांच्या या टीकेला मनसेकडून काय उत्तर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्यात झालेल्या या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरेंच्या ९ फेब्रुवारीच्या भाषणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्रातला एक नेता दगडाच्या बदल्यात दगड आणि तलवारीच्या बदल्यात तलवारीने उत्तर देईल अशी भाषा करतो आहे त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते जे बोलून गेले.. या नेत्यांची भाषणं ऐकायला आणि पाहायला लोक येतात” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पवारांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं असलं तरी दिल्लीतील स्वपक्षातील उमेदवारांना दिल्लीतील मतदाराने गांभीर्याने घेतलं नसल्याचं सांगायला विसरल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील निवडणुकीत त्यांच्या पक्षातील उमेदवार फतेह सिंह हे आधी आम आदमी पक्षाचे आमदार होते. पण त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना गोकलपूर येथून उमेदवारी देण्यात आली होती. मागील निवडणुकीत ‘आप’ची टोपी घालून विजय मिळवलेल्या फतेह सिंह यांना राष्ट्रवादीच्या घडाळ्यानं साथ दिली नाही. या निवडणुकीत त्यांनी दणक्यात मार खाल्ल्याचे पाहायला मिळते. सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यांना केवळ ४२० मते मिळाली होती. या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या सुरेंद्र कुमार यांना ८८ हजारांपेक्षा अधिक मते होती. भाजपाच्या रणजीत सिंग यांना ६८ हजारांवर मते मिळाली होती.

राष्ट्रवादीने राणा सुजीत सिंहला छत्तरपूर मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. मात्र त्यांनाही सपाटून मार खावा लागला. त्यांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १७१ मते मिळाली. मयूर बन यांना राष्ट्रवादीने मुस्तफाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांना केवळ २८८ मते मिळाली आहेत. त्यांच्यापेक्षा ‘नोटा’ला अधिक मते मिळाली. या मतदारसंघातील ४६२ लोकांना नोटाचा पर्याय निवडला. बाबरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर जाहीद अली रिंगणात उतरले होते. आप-भाजपाच्या लढाईत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यांनी मतांचे केवळ शतकच ठोकले. त्यापुढे त्यांना जाता आलं नाही.

 

Web Title:  NCP made very poor performance at Delhi Assembly Election 2020.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x