29 April 2024 7:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

राष्ट्रतपस्वी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रथम पुण्यतिथी

Atal Bihari Vajpayee, Narendra Modi, Pokharan nuclear bomb test

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील अटल स्मृती स्थळावर अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. वाजपेयींच्या ‘सदैव अटल’ स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींनी १६ ऑगस्ट २०१८ ला अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते सार्वजनिक जीवनात सक्रीय नव्हते.

अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात रस्त्यांच्या माध्यमातून देशाला जोडण्याचं काम केलं होतं. त्याचा फायदा आजही देशवासीयांना होत आहे. त्यांनी चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि मुंबईला जोडण्यासाठी ‘स्वर्णिम चतुर्भूज रस्ता प्रकल्प’ ही योजना लागू केली. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ‘पंतप्रधान ग्रामिण रस्ते विकास’ योजना लागू केली. त्यांच्या या निर्णयामुळे देशाच्या आर्थिक विकासातही भर पडली. माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक मानले जातात. परंतु या क्रांतीचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात केलं. १९९९ मध्ये त्यांनी बीएसएनएलच्या मक्तेदारीला संपवून नवं टेलिकॉम धोरण लागू केलं.

त्यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये उल्लेख करताना ‘यह देश कोई एक जमीन का टुकडा नहीं, यह जिता जागता राष्ट्रपुरुष है’ अशाप्रकारचे वर्णन केले होते आणि अशाप्रकारची प्रखर राष्ट्रीय भावना घेऊन राजकारण करणारे वाजपेयींमध्ये पुरुषार्थ जागविण्याचे तितकेच सामर्थ्य होते, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख तर आहेच परंतु पूर्णपणे राष्ट्रसमर्पित आणि नैतिक मूल्यांना सर्वतोपरी मानण्याचा त्यातूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय चारित्र्य आकाराला येईल असा दुर्दम्य आत्मविश्वास असलेला हा नेता जेवढ्या आपल्या वक्तृत्वाने लोकप्रिय झाला तितकाच आपल्या कर्तृत्वाने आपला अमिट ठसा उमटवणाराही होता.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x