अजब ! हाथरस गँगरेप घटना उत्तर प्रदेशातील | RPI'चं आंदोलन मुंबईत

मुंबई, ३० सप्टेंबर : हाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय.
दुसरीकडे सदर प्रकरणावर कोणतंही भाष्य न करता बॉलिवूडच्या अंतर्गत भानगडीत व्यस्त असल्याचं रामदास आठवलेंना सर्वानी पाहिलं आणि त्यांच्यावर चारही दिशेने टीकेचा भडीमार होऊ लागला आणि त्यानंतर सदर प्रकरणात त्यांनी भाष्य केलं आहे. हाथरसमधील पीडित दलित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्याविरोधात 1 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार असून 2 ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मृत दलित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार आहेत.
हाथरस मधील पीडित दलित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरुद्ध दि.1 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 30, 2020
दि.2 ऑक्टोबर ला हाथरस मधील पीडित दिवंगत दलित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 30, 2020
दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्षा मायावती यांनी या घटनेचा निषेध केला होता. उत्तर प्रदेशात कोणत्याही समाजातील कोणतीही महिला सुरक्षित नसल्याचे सांगत राज्य सरकारने त्याकडे लक्ष देण्यास सांगितले. तसेच पोलिसांनी परस्पर पीडित मुलीच्या कुटुंबियांना विश्वासात न घेता काल मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने अजून प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
News English Summary: A protest agitation will be organized by the Republican Party at Azad Maidan, Mumbai on October 1 at 1 pm against the inhuman atrocities committed on a Dalit girl victim in Hathras. On October 2, RPI National President and Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale will pay a condolence visit to the families of the victim Dalit girl victim in Hathras.
News English Title: Protest agitation will be organized by the Republican Party at Azad Maidan after Hathras gangrape Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
ED Vs Xiaomi | शाओमी कंपनीचा ईडीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावल्याचा गंभीर आरोप
-
ICICI Pru Guaranteed Pension Plan Flexi | आयसीआयसीआयचा प्रू गॅरंटीड पेन्शन प्लॅन फ्लेक्झी लाँच | डिटेल्स जाणून घ्या
-
Intraday Stocks For Today | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Intraday Stocks For Today | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Two Wheeler Loan | ड्रीम बाइक खरेदी करण्यासाठी टू-व्हीलर लोन घ्यायचा आहे? | त्यावेळी या गोष्टी लक्षात ठेवा
-
Multibagger Stocks | जबरदस्त शेअर्स | घसरणाऱ्या बाजारात देखील या 5 शेअर्सचे गुंतवणूकदार मालामाल
-
Rainbow Children's Midcare IPO | रेनबो चिल्ड्रन मिडकेअरचा शेअर उद्या लिस्ट होणार | तज्ज्ञ काय सांगतात?
-
Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याचे शेअर्सची यादी