नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या डील संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला बुधवारी झालेल्या सुनावणीत दहा दिवसांची मुदत ठरवून दिली आहे. केंद्रातील मोदी सरकारने दहा दिवसांत राफेल डील’मधील सर्व धोरणात्मक प्रक्रिया आणि किंमती संदर्भातील संपूर्ण तपशील लखोटाबंद पाकिटात न्यालयासमोर सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राफेल लढाऊ विमानांच्या डील प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांमध्ये राफेल डील संदर्भातील सविस्तर माहिती लखोटाबंद पाकिटात न्यालयात सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पुढे या संदर्भात काय अधिक माहिती बाहेर येते ते पाहावे लागणार आहे.
