11 December 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
x

बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील सुविधा मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात - शिवसेना

Shivsena, PM Narendra Modi, Bangladesh tour, Saamana Editorial

मुंबई, ३० मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला बांगलादेश दौरा चांगलाच चर्चिला गेला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याचा दावा केला आणि देशभरातून याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मोदींचा हा दावा अवास्तव असल्याची टीका करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनंही उपरोधिक शब्दांत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ‘ताम्रपट’ व पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात,’ अशी तिरकस मागणी करत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून नरेंद्र मोदी यांच्या दाव्यावर टीका करण्यात आली आहे. ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा. नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याने प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मतांचा चढउतार किती होईल हे आजच सांगता येणार नाही, पण मोदींचा दोन दिवसांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री. मोदी यांनी पुन्हा बांगलादेशात जायला हवे, हाच एक उपाय,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालातील विधानसभा निवडणुका भाजपाने म्हणजेच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत व त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. प. बंगालात मोठय़ा प्रमाणावर ‘बांगलादेशी’ घुसले आहेत. त्या व्होट बँकेवर अनेक मतदारसंघांचे निकाल बदलणार आहेत. प. बंगाल व बांगलादेशची भाषा एकच आहे. बांगलादेशात राहणाऱयांची नातीगोती प. बंगालात मोठय़ा प्रमाणावर आहेत. इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असे शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आले नाही. आश्चर्य असे की, त्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात आपलाही सहभाग होता, असे विधान मोदी यांनी बांगलादेशच्या भूमीवर जाऊन केले आहे असं सामनाने म्हटलं आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi’s recent visit to Bangladesh was well received. During the visit, Prime Minister Modi claimed that he had participated in the freedom struggle of Bangladesh and there were mixed reactions across the country. Criticizing Modi’s claim as untrue, he was heavily attacked. After that, now Shiv Sena has also targeted Prime Minister Modi in sarcastic words.

News English Title: Shivsena criticised PM Narendra Modi over his Bangladesh tour news updates.

 

 

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x