3 May 2025 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

मोदींचा माष्टर स्ट्रोक | रोजगाराविरुद्ध लढा | लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ नोकऱ्या सोडल्या

Stand up comedian, Kunal Kamra, Modi govt, unemployment

मुंबई, २५ फेब्रुवारी: सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून रोजगारासंदर्भातील विषय चांगलाच चर्चेत आहे. ‘मोदी रोजगार दो’ हा ट्रेण्ड रविवारी आणि सोमवारी ट्विटरवर टॉप ट्रेण्डींग टॉपिकमध्ये होता. मोदीजी, भाषणं नको रोजगार द्या असं म्हणणारे लाखो ट्विट करण्यात आले.

‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. या हॅशटॅगवर सहा लाख ७४ हजारांहून अधिक जणांनी ट्विट केलं आहे. अनेकांनी भाजपाने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलेलं त्याचं काय झालं असा प्रश्न विचारला आहे. राजकीय विषयांमध्ये मोदी रोजगार दो हा हॅशटॅग भारतात टॉप ट्रेण्डींग विषय आहे.

सीएमआयईईच्या अहवालानुसार २०२० मध्ये एक कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनी आपला रोजगार गमावला. खास करुन मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर जून आणि जुलैपर्यंत अनेकांनी आपला रोजगार गमावला. त्यामुळेच आता अर्थव्यवस्था हळूहळू सुरळीत होत असतानाच सरकारने दिलेलं आश्वासन पाळत बेरोजगारांना नोकरी द्यावी अशी मागणी ट्विटवरुन केली जात आहे.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराने मोदींची एका ट्विटद्वारे खिल्ली उडवली आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, ‘रात्रीच्या न्युज- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माष्टर स्ट्रोक….मोदींच्या रोजाराविरुद्धच्या लढ्यावरून आणि मोदींच्या समर्थनार्थ लोकांनी त्यांचा नोकऱ्या सोडल्या.

 

News English Summary: Tonight’s News, AMAZING MASTER STROKE BY PM MODI as people leave their jobs in support of Prime ministers stand against Employment said Kunal Kamra.

News English Title: Stand up comedian Kunal Kamra slams Modi govt over unemployment in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#KunalKamra(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या