26 January 2025 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

अफवांवर विश्वास ठेवू नका, विशेष रेल्वे सोडणार नाही: रेल्वे मंत्रालय

Corona Crisis, Covid19, Indian Railway

नवी दिल्ली, १५ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. देशव्यापी लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि विमान सेवाही ३ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. अशामध्ये विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याच्या अफवेमुळे मुंबईत स्थलांतरीत मजुरांनी वांद्रे स्थानकाबाहेर मोठी गेर्दी केली होती. या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणतीही विशेष ट्रेन सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊन वाढवल्याने १५ एप्रिल ते ३ मेपर्यंतची सर्व तिकीटं रेल्वेला रद्द करावी लागणार आहेत. जवळपास ३९ लाख तिकीटं रद्द करावी लागतील. २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार असल्याने १५ तारखेपासून रेल्वे सेवा सुरू होतील या अपेक्षेने रेल्वेने तिकीटांचे बुकींग सुरू केले होते. यामुळे ३९ लाख तिकीटांचे बुकींग झाले होते. देशातील १५ हजार रेल्वेतून दररोज जवळपास २ कोटी नागरिक प्रवास करतात.

देशातील लॉकडाउन पुन्हा ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी केली. दरम्यान, काही माध्यमांनी परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार रेल्वेकडून सुरु असल्याचे वृत्त दिले होते. त्याचा परिणाम म्हणून काल (मंगळवारी) वांद्रे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार एकत्र आले होते.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi announced a lockdown increase by May 3 on the back of Corona’s rise. Due to nationwide lockdown, rail and air services have been postponed till April 7. The migrant laborers had made a big rush outside Bandra station due to rumors that special trains would be operated. Do not believe the rumors, the Railway Ministry tweeted after the incident, saying that no special train will be released.

News English Title: Story ministry of railways clarified that there is no plan to run any a special train to clear the passenger rush migrants Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x