26 April 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

अतिथि देवो भव:! तुमच्या स्वागतासाठी आमच्या सरकारने उंच भिंत बांधली आहे: प्रियांका चतुर्वेदी

Shivsena Leader Priyanka Chaturvedi, US President Donald Trump, PM Narendra Modi

अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आमगन झालं आहे. त्यांच्या स्वगताला स्वत: पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शवली होती. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारतात असतील. यानिमित्त अहमदाबाद येथे अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ट्रम्प हे विमानतळावरून निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत. ३६ तासांच्या दौऱ्यात ट्रम्प अतिशय व्यस्त असणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारे ट्रम्प सातवे अमेरिकेचे अध्यक्ष असणार आहेत.

राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी कमीत कमी ३ महिने आधी यूएस सीक्रेट सर्व्हिस त्याठिकाणी पोहचते. स्थानिक पोलीस, सुरक्षा यंत्रणा यांच्या सहाय्याने राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याची तयारी केली जाते. वाहतुकीचा मार्ग, सर्वात जवळचं ट्रॉमा सेंटर याचीही माहिती घेतली जाते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सुरक्षित स्थळाची पाहणी केली जाते. ज्या लोकांपासून राष्ट्राध्यक्षाला धोका आहे अशा लोकांवर करडी नजर ठेवली जाते. दौऱ्याच्या काही दिवस अगोदर स्नीफर डॉग्स आणले जातात. त्यांच्या मदतीने राष्ट्राध्यक्षांच्या वाहतूक मार्गाची तपासणी केली जाते. तसेच या मार्गावर कोणत्याही वाहनांना पार्किंग करण्यावर बंदी आणली जाते.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अहमदाबाद दौऱ्यावेळी डोनाल्ड ट्रम्प ज्या मार्गाने स्टेडियमकडे जाणार होते, त्या मार्गावरील झोपडपट्ट्या ट्रम्प यांनी दिसू नये म्हणून भली मोठी भिंत उभारून त्या वस्त्या झाकण्याचा प्रकार घडला आहे. त्यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती आणि त्याचाच धागा पकडून शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींना सरकारला टोला लगावला आहे.

त्यावर ट्विट करताना प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे की, “अतिथि देवो भव: को ध्यान में रखते हुए हमारी देश की सरकार ने आज आपके स्वागत में लम्बी और ऊँची दीवार बनाई है, जैसे आपको उत्कृष्ट व्यू मिले और गरीब जनता से रूबरू ना होना पड़े।

 

 

 

News English Summery: US President Donald Trump arrives at Ahmedabad airport Prime Minister Narendra Modi himself had made his presence known. They will be in India for two days, February 7 and 8 An unprecedented security system has been deployed at Ahmedabad for this purpose. As Trump leaves the airport, millions of people will be greeted on the side of the road at the ‘Road Show’. Trump is going to be very busy in the 2-hour tour. Trump will be the seventh US president to visit India.

 

Web Title: Story Shivsena leader Priyanka Chaturvedi criticized PM Narendra Modi over US President Donald Trump visit.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x