23 April 2025 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN
x

'बात बिहार की'..निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर कल्पना चोरतात?

I PAC Prashant Kishor, Baat Bihar Ki Concept

पाटणा: प्रसिद्ध निवडणूक प्रचार रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याविरोधात बिहारमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मोतीहारी येथील रहिवासी शाश्वत गौतम यांची कल्पना चोरल्याचा आरोप प्रशांत किशोर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाईव्ह हिंदुस्तानने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

‘बात बिहार की’ ही नवी प्रचार मोहिम प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी सुरू केली. ही कल्पना आपली असल्याचे शाश्वत गौतम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपला एक माजी सहकारी ओसामा याने ही कल्पना प्रशांत किशोर यांना सुचविली आणि ती त्यांनी जशीच्या तशी वापरली, असे शाश्वत गौतम यांचे म्हणणे आहे. शाश्वत गौतम यांनी ओसामा यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे.

पूर्वी चंपारण्य जिल्ह्यातील एका इंजिनियने ‘बिहार की बात’ या त्यांच्या कॅम्पेनची प्रशांत किशोर यांनी चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाठणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे.

शाश्वत गौतम हे आधी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. तर ओसामा यांनी पाटणा विद्यापीठामध्ये विद्यार्थी निवडणूक लढविली होती. शाश्वत गौतम यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, बिहार की बात या नावाने आपण जानेवारीमध्येच एक डोमेन नेम आरक्षित करून ठेवले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये प्रशांत किशोर यांनी फेब्रुवारीमध्ये या नावाने नवी वेबसाईट सुरू केली.

 

News English Summery: A few days ago Prashant Kishore launched the new campaign ‘Baat Bihar Ki’. In his complaint Shashwat Gautam said that the idea was yours. Shashwat Gautam says that Osama, a former colleague, suggested the idea to Prashant Kishore and used it as he did. Shashwat Gautam has also filed a complaint against Osama.

 

Web Title: story Youth accuses I PAC founder Prashant Kishor of copying his idea forgery case filed.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या