नवी दिल्ली, १८ ऑगस्ट : सोमवारी रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याचे समजते. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.

अमित शाह यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरीया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमित शाह यांची प्रकृती ठिक असून ते रुग्णालयातून आपलं काम पाहणार असल्याची माहितीही रुग्णलायाकडून देण्यात आली आहे.

अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. शाह यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती.

 

News English Summary: Home Minister Amit Shah, who tested negative for COVID-19 last week, has been admitted to AIIMS in Delhi, the government hospital said in a statement. The Home Minister has been “complaining of fatigue and body ache for last three-four days”, the hospital said.

News English Title: Union Home Minister Amit Shah Admitted To AIIMS Days After Recovery From Coronavirus News Latest Updates.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा AIIMS’मध्ये दाखल | कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह