14 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Investment Planning | एलआयसीची नवीन ग्रुप हेल्थ रायडर पॉलिसी | अ‍ॅक्सिडेंट कव्हरेज सुद्धा मिळेल

Investment Planning

LIC’s Group Accident Benefit Rider | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) नवीन ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी बाजारात आणली आहे. ही पॉलीसी ३ जून रोजी सुरू करण्यात आली आहे. विमा कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. एलआयसीचे ग्रुप अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर असे या पॉलिसीचे नाव आहे.

मात्र, अद्याप या पॉलिसीबाबत फारशी माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पण बीएसईकडे दाखल केलेल्या परिपत्रकानुसार हे नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, ग्रुप हेल्थ रायडर पॉलिसी आहे. विमा कंपनी एलआयसीने देशांतर्गत बाजारात लाँच केले आहे.

आयपीओनंतर दुसरी पॉलिसी :
विमा कंपनी एलआयसीने नुकताच आपला आयपीओ लाँच केला असून, त्यानंतर कंपनीची ही दुसरी नवी पॉलिसी आहे. याआधी एलआयसीने 27 मे रोजी आपली आणखी एक नवी पॉलिसी बीमा रत्न लाँच केली आहे.

30 मे रोजीचा आर्थिक निकाल :
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ३० मे रोजी आपला निकाल जाहीर केला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा जवळपास १७ टक्क्यांनी घसरून २,४०९ कोटी रुपयांवर आला आहे. त्याचबरोबर विमा कंपनीने आपल्या पॉलिसीधारकाला प्रति शेअर दीड रुपये लाभांश देण्याची घोषणाही केली आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर कंपनीचा हा पहिलाच निकाल होता.

नुकताच आयपीओ लाँच केला :
एलआयसीने आपला 21 हजार कोटींचा आयपीओ 17 मे रोजी लाँच केला होता. लोकांमध्ये खूप क्रेझ असूनही एलआयसी आयपीओ जवळपास 8% सवलतीत लिस्ट करण्यात आला होता. ३ जून रोजी व्यापार बंद केल्यानंतर कंपनीचे समभाग प्रति शेअर ८००.४५ रुपयांवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Investment Planning in LIC’s Group Accident Benefit Rider check details 05 June 2022.

हॅशटॅग्स

#Investment Planning(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x