2 October 2022 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CBSE Board Exam 2023 | सीबीएसई दहावी-बारावी परीक्षेची डेटशीट डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार, संपूर्ण अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जाणार Straight Hair Formulas | पार्लरमध्ये न जाता घरबसल्या कमी खर्चात करा हेअर स्ट्रेटनिंग, फॉलो करा या टिप्स Budhaditya Yoga | ऑक्टोबरमध्ये बनवलेला हा खास योग, या 4 राशींच्या लोकांसाठी प्रगतीच्या संधी आणि शुभं आर्थिक काळ SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना कोटीत परतावा देत आहे, 9 पटीने पैसा वाढतोय, योजनेचं नाव सेव्ह करा 5G Internet Network | भारतात 5G लाँच, आता 4G सिम कार्ड फेकून नवा 5G स्मार्टफोन विकत घ्यावाच लागणार?, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं Credit Card | तुमच्या क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे हे 5 शुल्क तुम्हाला माहित आहेत का?, हे गुप्त चार्जेस नेहमी लक्षात ठेवा, नुकसान टाळा Horoscope Today | 02 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Insurance Premium | विम्याचा हफ्ता ठरवण्यात नवीन बदल, घर किंवा कारच्या कर्जाप्रमाणे विम्याचा हप्ता ठरवला जाणार

insurance premium

Insurance Premium | विमा क्षेत्रात काही बदल होणार आहेत उदाहरणार्थ, ज्याचा विमा स्कोअर जास्त असेल, त्याला कमी प्रीमियममध्ये विमा मिळू शकेल. असे केल्याने विमा प्रीमियमची प्रणाली पारदर्शक होईल. लवकरच कंपन्या विमा स्कोअर प्रणालीचा अवलंब करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. विमा स्कोअर हा CIBIL स्कोअर सारखाच असेल ज्याने सर्वसामान्यांना कमी खर्चात विमा सुरक्षा घेता येईल. देशातील विमा क्षेत्रात मोठ्या बदलाची तयारी सुरू आहे. आतापर्यंत विमा कंपन्या तुमचे वय आणि तब्येत पाहून तुमच्या विम्याचे प्रीमियम ठरवत होती. यातही प्रत्येक कंपनीची मूल्यमापन पद्धत वेगवेगळी असते, आणि प्रिमियम देखील त्यानुसार ठरलेला असतो. पण लवकरच या व्यवस्थेत बदल होऊ शकतो.

एका बिझनेस न्यूज चॅनलच्या मते, लवकरच कंपन्या विमा स्कोअर प्रणालीचा अवलंब करू शकतात. जसे बँकिंग कंपन्या घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज देताना CIBIL स्कोर ग्राह्य धरतात, त्याच प्रकारे विमा स्कोअर ही नवीन पद्धत विम्याच्या बाबतीतही कार्य करेल. तुमचे कर्जाचे दर CIBIL स्कोअरच्या आधारे ठरवले जातात. अशी एक नवीन पद्धत आता विम्याच्या हप्त्याच्या बाबतीत दिसून येणार आहे.

विम्याचा हप्ता कमी होऊ शकतो :
विमा क्षेत्रातील तज्ञ म्हणतात की, विमा स्कोअरचा अवलंब केल्यामुळे विमा प्रीमियमच्या प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल. ज्याचा विमा स्कोअर जास्त असेल, त्याला कमी प्रीमियममध्ये विमा मिळू शकेल. यामुळे सर्वसामान्यांना कमी खर्चात विमा सुरक्षेचा लाभ मिळू शकेल.

इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरोचे खाजगीकरण :
इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरो कडे देशातील सर्व विमा कंपन्यांच्या विमा पॉलिसींची माहिती असते. आता त्याचे खाजगीकरण होणार आहे. असे केल्याने खाजगी आणि सरकारी विमा कंपन्या ग्राहकांशी संबंधित माहितीचे आणि डेटाचे जोखीम विश्लेषण करण्यास सक्षम होतील. यामुळे विमा कंपन्यांना प्रीमियम निश्चित करण्यात मदत होईल.

फसवणूक कमी होईल :
विमा क्षेत्रातील कंपन्यांसाठी फसवणूक ही मोठी समस्या आहे. त्यामुळे फसवणुकीला आळा बसेल, असा तज्ञांचा विश्वास आहे. कमी फसवणूक दाव्याचा परिणाम सर्वांसाठी कमी प्रीमियम असेल. यामुळे विमा कंपन्यांना नो क्लेम बोनस देण्याचीही सोय होईल. त्याच वेळी, आरोग्य विमा कंपन्या देखील ग्राहकांना कमी दरात चांगले फायदे देऊ शकतील.

सिबिल स्कोअर काय आहे :
CIBIL स्कोअर हा 300 ते 900 मधील तीन अंकी क्रमांक असतो, जो तुमची कर्ज घेण्याची पात्रता दर्शवतो. उच्च स्कोअर तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्डवर जलद मंजूरी आणि चांगले सौदे मिळविण्यात मदत करू शकतो. बहुतेक बँका आणि गैर बँकिंग वित्तीय संस्थांकडून, कर्ज घेण्यासाठी किमान क्रेडिट स्कोअर 750 असावा लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Insurance Premium will be decided by Insurance Premium scores on 1 August 2022.

हॅशटॅग्स

insurance premium(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x