26 November 2022 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Weekly Horoscope | 28 नोव्हेंबर - 4 डिसेंबर | 12 राशीच्या लोकांसाठी कसा राहील आगामी आठवडा, नशीबाची साथ कोणाला? Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा Horoscope Today | 27 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 27 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला? Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय? Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन
x

Investment Tips | या सरकारी योजनेत फक्त 233 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करून 17 लाख रुपये परतावा मिळवा, योजना समजून घ्या

Investment tips, LIC

Investment Tips | लाईफ इन्शुरन्स कॉर्प म्हणजेच LIC आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन पॉलिसी जाहीर करत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त योजना बाजारात आणली आहे, तिचे नाव आहे “LIC जीवन लाभ योजना”. जी तुम्हीही एखाद्या सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर, एलआयसीची ही जीवन लाभ योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. LIC जीवन लाभ योजना ही एक अशी जीवन पॉलिसी आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 233 रुपये गुंतवून 17 लाखांचा परतावा कमवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या पॉलिसीबद्दल सविस्तर पणे

LIC जीवन लाभ योजना :
ही LIC ची एक नॉन-लिंक पॉलिसी आहे. LIC च्या या योजनेचा शेअर बाजारातील चढ उताराशी कोणताही संबंध नाही. बाजार वर किंवा खाली गेला तरी त्याचा तुमच्या या योजनेतील गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. ही एक मर्यादित प्रीमियम योजना आहे. LIC ने आपल्या ग्राहकांच्या गरजा, जसे की मुलांचे लग्न, शिक्षण आणि मालमत्ता खरेदी या सर्वांचा विचार करून ही योजना बाजारात आणली आहे.

योजनेची खास वैशिष्ट्ये :
* LIC ची जीवन लाभ योजना संरक्षण आणि हमखास परतावा दोन्ही देते.
* 8 ते 59 वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
* या पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
* किमान गुंतवणूक मर्यादा 2 लाख रुपये असून
* कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.
* 3 वर्षांचा प्रीमियम भरल्यावर तुम्ही पॉलिसीवर कर्ज घेण्यास पात्र होऊ शकता.
* प्रीमियमवर आणि पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यावर जो पैसा मिळेल त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
* पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर नॉमिनीला विमा रक्कम आणि बोनसचा लाभ दिला जाईल.

जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी चालू असताना मृत्यू झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रीमियम भरले असतील, तर त्याच्या वारसदाराला डेथ सम अॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस चा लाभ दिला जाईल. म्हणजेच, नॉमिनीला अतिरिक्त विम्याची रक्कमही मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment tips on LIC Jeevan Labh Policy benefits on 23 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x