
Investment Tips | जर तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळातील खर्चाची सोय आताच करून ठेवायची असेल, तर आज लेखात आम्ही तुम्हाला LIC च्या एका गुंतवणूक योजनेबद्दल माहिती देणार आहोत, जी तुम्हाला वृध्द काळात पेन्शन रूपाने दर महिन्याला परतावा देईल. सर्वानाच आपले भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित आणि सक्षम बनवायचे असते. त्यासाठी तुझी आतापासूनच गुंतवणूक केली पाहिजे, जेणे करून भविष्यात तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
एलआयसी जीवन शांती पॉलिसी :
LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन पॉलिसी जाहीर केली आहे. “LIC जीवन शांती पॉलिसी” असे या योजनेचे नाव आहे. एकदा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर तुम्हाला परतावा म्हणून आजीवन सुरक्षित आणि हमखास पेन्शन दिली जाईल. LIC च्या या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचा आणि वृद्ध काळातील खर्च सहज भागवू शकता.
एलआयसी जीवन शांती योजना :
एलआयसी ची जीवन शांती योजना ही LIC च्या जुन्या जीवन अक्षय पॉलिसी सारखीच आहे. जीवन शांती योजनेत तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध करून दिले जातील. पहिला पर्याय असेल तात्काळ वार्षिक प्रकारचा आणि दुसरा पर्याय असेल स्थगित वार्षिक प्रकारचा. जीवन शांती योजना ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. पहिल्या पर्यायानुसार म्हणजेच तात्काळ वार्षिकी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच पेन्शनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. दुसरा पर्याय अंतर्गत म्हणजेच डिफर्ड अॅन्युइटीच्या पर्यायामध्ये तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनी तुम्हाला पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेची एक खास गोष्ट अशी आहे की, तुम्ही हवी तेव्हा तुमची पेन्शन सुरू करू शकता.
पेन्शन रुपात मिळणारा परतावा :
LIC च्या जीवन शांती योजनेंतर्गत पेन्शनची कोणतीही रक्कम ठरवण्यात आलेली नाही. तुमची गुंतवणूक रक्कम, वय आणि स्थगिती कालावधीनुसार तुम्हाला पेन्शन मिळेल. गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल किंवा गुंतवणूक सुरू करतानाचे वय आणि पेन्शन सुरू होण्या दरम्यानचा कालावधी जेवढा जास्त असेल, तितके जास्त पेन्शन मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार तुम्हाला मासिक पेन्शन दिले जाईल.
गुंतवणुकीची वयोमर्यादा :
LIC च्या ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनधरकाचे किमान वय 30 वर्षे आणि कमाल 85 वर्षे ठरवण्यात आले आहे. याशिवाय, जीवन शांती योजनेत पेन्शन सुरू झाल्याच्या 1 वर्षानंतर तुम्ही कर्ज घेऊ शकता. आणि पेन्शन सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर तुम्ही योजना सरेंडर करू शकता. योजना धारकला गुंतवणुकीच्या सुरुवातीला दोन्ही उपलब्ध पर्यायांसाठी वार्षिक व्याज परतावा दरांची हमी दिली जाते. LIC जीवन शांती योजनेअंतर्गत विविध अॅन्युइटी पर्याय आणि अॅन्युइटी पेमेंटच्या पद्धती उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु ही पॉलिसी घेण्यापूर्वी लक्षात ठेवा की एकदा निवडलेला पर्याय तुम्ही पुन्हा बदलू शकता नाही. ह्या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करून गुंतवणूक करू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.