20 April 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips | भारतातील सर्वात विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी LIC आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त प्रकारच्या सर्वोत्तम गुंतवणूक आणि विमा योजना लाँच करत असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुक करून खूप श्रीमंत व्हायचे असेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका जबरदस्त पॉलिसी योजने माहिती सांगणार आहोत. या पॉलिसीमध्ये तुम्ही फक्त 233 रुपये महिन्याला जमा करून भरघोस परतावा मिळवू शकता. या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 17 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.

एलआयसी जीवन लाभ :
LIC जीवन लाभ या नावाने ओळखल्या जाणार्‍या पॉलिसीचा हा आगळा वेगळा प्रकार LIC कंपनीने बाजारात लाँच केला आहे. या योजनेतील गुंतवणुकीचा शेअर बाजाराशी काहीही संबंध नसेल. बाजार खाली किंवा वर गेल्यावर तुमच्या गुंतवलेल्या पैशावर कोणताही परिणाम होणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यावर तुम्हाला हमखास नफा मिळेल हे नक्की. ह्या योजनेत तुम्ही एका ठराविक कालमर्यादेसह प्रीमियम भरू शकता. एलआयसीने तुमच्या मुलांचे लग्न, शिक्षण आणि मालमत्तेची खरेदी असे सर्व आर्थिक उद्दिष्ट लक्षात घेऊन आपल्या ग्राहकांसाठी ही जबरदस्त योजना बनवली आहे.

योजनेचे खास वैशिष्ट्ये :
1. LIC ची जीवन लाभ योजना आपल्या ग्राहकांना पॉलिसीवर जबरदस्त परतावा फायदे आणि संरक्षण दोन्ही देते.
2. 8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती या पॉलिसीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.
3. या पॉलिसीची कालमर्यादा 16 ते 25 वर्षांपर्यंत बदलते.
4. किमान विमा मर्यादा 2 लाख रुपयांपासून सुरुवात होते.
5. या योजनेत कमाल गुंतवणुकीची कोणतही मर्यादा नाही.
6. 3 वर्षांचा प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला या योजनेतून कर्जाची सुविधा देखील दिली जाईल.
7. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला प्रीमियम आणि विमा रकमेवर कर सवलत आणि बोनस असे दोन्ही लाभ दिले जातील.

नॉमिनी बेनिफिट :
जर समजा एखाद्या पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान अचानक मृत्यू झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रीमियम भरले असतील, तर त्याच्या नॉमिनीला डेथ सम अॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि डेथ बेनिफिट म्हणून अतिरिक्त बोनस रक्कम दिली जाईल. दुसऱ्या शब्दांत, नॉमिनीला भरलेल्या विमा रकमेवर अतिरिक्त विमा रक्कम मिळेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment Tips on LIC life insurance policy benefits on 19 August 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(142)#LIC(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x