
Insurance E-Policy | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI ही भारतातील विमा क्षेत्राचे नियोजन आणि नियमन करणारी नोडल संस्था आहे. IRDAI ने नुकताच एक नियम जाहीर केला आहे. आता सर्व विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. IRDAI चा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, सर्व नवीन विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी करण्यात येईल. यासोबतच, विमा कंपन्यांना आता त्यांच्या विद्यमान पॉलिसीधारकांनाही ई-विम्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल.
IRDAI मार्फत नवीन ऑफर्स :
IRDAI ने विमा कंपनीना विनंती केली आहे की, जी ग्राहकाने थेट इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून पॉलिसी खरेदी केलं तर त्यांना सवलत द्यावी. या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वाबाबत 20 ऑक्टोबरपर्यंत भागधारकांकडून सल्ला आणि टीप मागवण्यात आली आहे. IRDAI ने नुकताच ई-पॉलिसी जारी करण्याच्या विद्यमान नियमांवर विचारमंथन केले होते आणि त्यात काही बदल सुचवले होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी जारी केलेल्या मसुद्यात IRDAI ने स्पष्ट केले आहे की, विमा व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि विमा कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा यासाठी हे नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये आता पॉलिसी धारकला विमा कंपनीमार्फत फिजिकल फॉर्मसोबतच ई-फॉर्मही दिला जाईल.
IRDAI ने आपल्या प्रस्तावात म्हंटले आहे की वर्ष विमा कंपनी यापुढे आपल्या विमा पॉलिसी फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी करतील. पॉलिसी ची ऑफर ई-मोडद्वारे प्राप्त झाली असेल किंवा ऑफलाईन, विमा कंपनीला पॉलिसी आता इलेक्ट्रॉनिक रुपात जारी करावी लागेल. विमा एजंटमार्फत थेट प्राप्त झालेला ई-प्रस्तावही इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे मंजूर करण्याचे बंधन IRDAI विमा कंपनीवर घातले आहेत. सर्व विमा कंपन्यांना पॉलिसीधारकांची माहिती भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी योग्य ती यंत्रणा उभारावी लागेल.
ई-विमा खाते आवश्यक :
IRDAI ने सांगितले की, सर्व पॉलिसीधारकांना इलेक्ट्रॉनिक विमा खाते म्हणजेच EIA/Electronic Insurance Account असणे आवश्यक आहे. पॉलिसीधारकांना जारी केलेली पॉलिसी EIA मध्ये जतन करून ठेवावी लागेल. प्रत्येक विमा कंपनीकडे EIA क्रमांक तयार करण्यासाठी एक उपकरण असेल. विमा कंपन्यांना ई-विमा पॉलिसीची एक अधिकृत प्रत आणि ऑफर नमूद असलेले फॉर्म, विमाचे फायदे आणि इतर संबंधित कागदपत्रे ग्राहकांच्या ईमेलवर पाठवणे आवश्यक आहे.
प्रत्येक विमा कंपनी आपल्या ग्राहकांच्या EIA मध्ये इलेक्ट्रॉनिक पॉलिसी जारी केल्यावर, त्या पॉलिसीधारक व्यक्तीला त्याच्या ईमेल आयडी वर आणि.मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे सूचना दिली जावी. सूचना आणि माहिती एसएमएस द्वारे हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत द्यावी लागेल. विमा कंपन्यांना हा नियम लागू झाल्यापासून एक वर्षाच्या आत सर्व विद्यमान पॉलिसीधारकांची पॉलिसी ई-पॉलिसीमध्ये रूपांतर उपलब्ध करून द्यावी लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.