15 December 2024 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

LIC Policy Surrender | तुमच्याकडे असलेली एलआयसी पॉलिसी डोईजड झाली आहे?, तुम्ही अशाप्रकारे सरेंडर करू शकता

LIC policy surrender

LIC Policy Surrender | आपण काही वेळा पॉलिसी घेऊन टाकतो पण काही काळानंतर आपल्याला कळते की हवा तसा फायदा होत नाही आहे. जर तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसीशी समाधानी नसाल, तर तुम्ही ती सरेंडर करू शकता. हो, जितका अधिक काळनंतर तुम्ही पॉलिसी सरेंडर कराल, तितकाच तुम्हाला फायदा होईल, अन्यथा नुकसान अधिक होऊ शकते.

एलआयसी इंडिया :
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ही भारतातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध विमा कंपनी आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत, कंपनी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या एलआयसी योजना राबविण्याचे काम करते. परंतु बरेचदा लोक एलआयसीचे फायदे आणि वैशिष्ट्ये नीट जाणून न घेता ते खरेदी करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात.

मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसी सरेंडर करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. तुम्‍ही तुमच्‍या पॉलिसी गुंतवणुकीत खूश नसल्‍यास, तुम्‍ही मुदत पूर्ण होण्या आधी ती समर्पण करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. एलआयसी पॉलिसी समर्पण केल्यानंतर, जीवन विमा संरक्षण बंद होते, कारण त्यानंतर कंपनी आणि ग्राहक यांच्यातील करार संपुष्टात येतो.

एलआयसी पॉलिसी कशी सरेंडर करावी ?
मुदत पूर्ण होण्या आधी पॉलिसी सरेंडर केल्यास पॉलिसीच्या रकमेचे मूल्य कमी होते. कमीत कमी सलग ३ वर्षे प्रीमियम भरल्यानंतरच तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकता. जर तुम्ही तीन वर्ष पूर्ण होण्या आधी पॉलिसी चे समर्पण केले तर तुम्हाला कोणताही परतावा दिला जाणार नाही. गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू अंतर्गत, ग्राहकांना कंपनीकडून भरलेले प्रीमियम आणि परतावा लाभांसाठी भरलेले प्रीमियम वगळून फक्त 30 टक्के पैसे मिळतील. पॉलिसी उशिरा सरेंडर केल्यास जास्त पैसे मिळतात. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एलआयसीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

एलआयसी पॉलिसीची स्थिती कशी तपासायची? 

पॉलिसीची स्थिती जाणून घेण्यासाठी,
1. भारतीय आयुर्विमा निगम अर्थात LIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. यासाठी तुम्ही https://www.licindia.in वेबसाईट वर भेट द्या.
3. या वेबसाईट वर तुम्हाला प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी, https://ebiz.licindia.in/D2CPM/#Register या लिंकवर भेट द्या.
4. येथे तुम्ही तुमचे नाव, पॉलिसी क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
5. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमचे एलआयसी खाते कधीही उघडून स्थिती तपासू शकता.
6. अधिक माहितीसाठी तुम्ही खालील फोन नंबरवर कॉल करून तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. यासाठी तुम्ही 022 6827 6827 वर कॉल करू शकता.
7. तुम्ही ह्या 9222492224 नंबर वर मेसेज करून ही मदत मिळवू शकता. तुम्हाला ह्या नंबर फक्त LICHELP लिहून मेसेज करायचे आहे. यासाठी कोणताही चार्ज आकारला जाणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC policy surrender online process and Helpline contact number on 2 August 2022.

हॅशटॅग्स

#LIC Policy Surrender(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x