 
						LIC Policy Surrender Online | जर तुम्हाला LIC ची पॉलिसी बंद करायची असेल, म्हणजेच पॉलिसी सरेंडर करायची असेल, तर त्यासाठी काय करावे लागते ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. LIC ची पॉलिसी बंद करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही LIC पॉलिसी सुरू केल्यावर किमान 3 वर्षानंतरच ती सरेंडर किंवा बंद करू शकता. जर तुम्हाला पॉलिसी सुरू केल्यावेर 3 वर्षापूर्वी बंद करायची असेल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळणार नाही.
जर तुम्ही एलआयसी पॉलिसी नियमांनुसार सरेंडर किंवा बंद केली तर तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू परत केली जाईल. पॉलिसी बंद केल्यावर, गुंतवणूक मूल्याच्या बरोबरीची रक्कम परत केली जाते, त्याला सरेंडर मूल्य म्हणतात. LIC ने दिलेल्या निर्धारित केलेल्या नियमानुसार जर तुम्ही संपूर्ण तीन वर्षांसाठी LIC चा प्रीमियम भरला असेल, तर तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू परत केली जाईल.
समर्पण मूल्य कसे मोजतात?
पॉलिसी सरेंडर केल्यावर किंवा बंद पॉलिसीधारकाला निश्चितच नुकसान सहन करावा लागतो. परंतु जर तुम्ही सलग 3 वर्षे पॉलिसी प्रीमियम भरला असेल, तर तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू दिली जाईल. त्यानंतर, पहिल्या वर्षासाठी तुम्ही भरलेल्या प्रीमियमची रक्कम शून्य होईल, अंक उरलेल्या दोन वर्षांसाठी, तुम्हाला 30 टक्के रक्कम परत केली जाईल. एवढेच नाही तर यात रायडर्ससाठी भरलेला कोणताही अतिरिक्त प्रीमियम,कर, LIC कडून मिळालेला कोणताही बोनस समाविष्ट असणार नाही.
पॉलिसी समर्पण धोरण :
तुम्हाला जर LIC ची पॉलिसी सरेंडर किंवा बंद करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला LIC चा सरेंडर अर्ज आणि NEFT फॉर्म भरावा लागेल. यासोबत तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची प्रत आणि पॉलिसीची मूळ कागदपत्रे अर्जासोबत जोडावे लागेल आणि सबमिट करावी लागेल. तसेच, तुम्ही पॉलिसी का बंद करत आहात हे तुम्हाला हाताने लिहिलेल्या एका अर्जात स्पष्ट शब्दात कळवावे लागेल.
पॉलिसी बंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
1) मूळ पॉलिसीचे बाँड दस्तऐवज आणि संबधित सर्व कागदपत्र
2) LIC पॉलिसी सरेंडर फॉर्म क्रमांक 5074 (फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता).
3) बँक खात्याचे तपशील
4) LIC चा NEFT फॉर्म (जर तुम्ही सरेंडर फॉर्म वापरत नसाल).
5) मूळ ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		