29 March 2024 9:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Vehicle Insurance Premium | 1 जूनपासून वाहन इन्शुरन्स महागणार | तुमच्या वाहनानूसार इतकी वाढ होणार

Vehicle Insurance Premium

Vehicle Insurance Premium | कारसह इतर ड्रायव्हर्ससाठी ही चांगली बातमी आहे. १ जून २०२२ पासून तुमच्या कारची विमा किंमत वाढेल (मोटर इन्शुरन्स प्रिमियम हाइक). केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटार व्हेईकल इन्शुरन्सच्या प्रीमियम दरात वाढ केली. आता कारच्या इंजिननुसार तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली असून त्यात म्हटले आहे की, मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये 2019-20 साठी शेवटचा बदल करण्यात आला होता. कोविड-19 महामारीच्या काळात यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आता वेगवेगळ्या इंजिन क्षमतेसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्सचा दर वाढवण्यात येत आहे. प्रीमियमचे नवे दर १ जूनपासून लागू होणार आहेत.

कोणत्या वाहनावर किती खर्च होईल:
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १,० सीसीपेक्षा कमी क्षमता असलेल्या इंजिनसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम २,०९४ रुपये निश्चित करण्यात आला आहे. २०१९-२० मध्ये ही रक्कम २,०७२ रु. त्याचप्रमाणे एक हजार सीसी ते दीड हजार सीसीच्या वाहनांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम ३ हजार २२१ रुपयांवरून ३ हजार ४१६ रुपये करण्यात आला आहे. मात्र, १५०० सीसीपेक्षा अधिक गाड्यांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये किरकोळ वाढ झाली आहे. तो दोन वर्षांपूर्वीच्या ७,८९० रुपयांवरून ७,८९७ रुपयांवर गेला आहे.

दुचाकींचेही नवे दर निश्चित :
टू-व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमही बदलण्यात येणार आहे. १ जूनपासून १५० सीसी ते ३५० सीसीच्या बाइकचे प्रीमियम १,३६६ रुपये, तर ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या इंजिनचा प्रीमियम आता २,८०४ रुपये होणार आहे.

एक हजार सीसीच्या गाडीसाठी तीन वर्षांचा एकरकमी प्रीमियम आता ६५२१ रुपये निश्चित करण्यात आला आहे, तर एक हजार सीसी ते दीड हजार सीसीपर्यंतच्या गाड्यांसाठी तीन वर्षांचा एकरकमी प्रीमियम आता १० हजार ६४० रुपये इतका असेल. ज्या गाड्यांचे इंजिन दीड हजार सीसी क्षमतेपेक्षा अधिक आहे, त्यांना आता किमान तीन वर्षांसाठी २४ हजार ५९६ रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागणार आहे.

दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षांचा प्रीमियम :
७५ सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या बाइकसाठी पाच वर्षांचा सिंगल प्रिमियम २ हजार ९०१ रुपये, तर ७५ सीसी ते १५० सीसीपर्यंतच्या बाइकवरील पाच वर्षांचा सिंगल प्रिमियम आता ३ हजार ८५१ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे १५० सीसीपेक्षा अधिक आणि ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी वाहनांसाठी आता ७ हजार ३६५ रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे, तर ३५० सीसीवरील दुचाकींसाठी १५ हजार ११७ रुपये मोजावे लागणार आहेत.

ई-कारवर प्रीमियम काय आहे:
सरकारने खासगी ई-कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमही निश्चित केला आहे. आता ३० किलोवॅटपर्यंत क्षमता असलेल्या ई-कारचा तीन वर्षांचा प्रीमियम ५,५४३ रुपये असेल. त्याचप्रमाणे ३० किलोवॅट ते ६५ किलोवॉटपर्यंतच्या ई-कारसाठी ९ हजार ४४ रुपये असा तीन वर्षांचा प्रीमियम आकारण्यात येणार आहे. ६५ किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या ई-कारसाठी आता तीन वर्षांसाठी २० हजार ९०७ रुपये प्रीमियम आकारण्यात येणार आहे.

ई-स्कूटरवर 5 वर्षांचा प्रीमियम किती असेल:
३ किलोवॅट क्षमतेच्या ई-स्कूटरसाठी पाच वर्षांचा सिंगल प्रिमियम २,४६६ रुपये, तर ३ किलोवॅट ते ७ किलोवॉट क्षमता असलेल्या ई-स्कूटरसाठी प्रीमियम ३,२७३ रुपये इतका असेल. त्याचप्रमाणे ७ किलोवॅट ते १६ किलोवॉट क्षमतेच्या दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षांसाठी ६ हजार २६० रुपये प्रीमियम, तर १६ किलोवॅटपेक्षा अधिक क्षमता असलेल्यांना १२ हजार ८४९ रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vehicle Insurance Premium hike from 1 June check details here 26 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x