
Sri Lanka Crisis | श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे. रिपोर्टनुसार, शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला. या परिस्थितीत श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना हा निर्णय घ्यावा लागला. हजारो निदर्शकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे राष्ट्रपती भवनातून पलायन :
श्रीलंका सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. महागाई गगनाला भिडली आहे. भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंतच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पेट्रोल, डिझेलचा प्रचंड तुटवडा आहे. काही केल्या परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने आता तेथील नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घालताच राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती भवनातून पलायन केले.
निदर्शनांपूर्वी संचारबंदी उठविली :
खरं तर, श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघटना, मानवी हक्क गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर, पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी निदर्शनांपूर्वी संचारबंदी उठविली. सरकारविरोधी निदर्शने रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
गंभीर आर्थिक संकटाचा सामना :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतातील सात पोलिस विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, ज्यात नेगोम्बो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लाव्हिनिया, उत्तर कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो सेंट्रल यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. श्रीलंकेला सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.