3 May 2025 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो अबे राजीनामा देणार

Japan Prime Minister Shinzo Abe, health deteriorated, Resign Prime Minister post

टोकियो, २८ ऑगस्ट : जपानचे पंतप्रधान शिंजो अबे प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा देणार आहेत. शिंजो अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावं लागतं. त्यामुळेच अबे पंतप्रधान पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्याकडून लवकरच याबद्दलची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. शिंजो अबे यांना गेल्या आठवड्याभरात दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अबे राजीनामा देणार असल्याचं वृत्त समोर येताच जपानचा शेअर बाजार कोसळला.

मागील काही दिवसांपासून आबे यांनी प्रकृतीसंदर्भातील तक्रारीमुळे दोन वेळा रुग्णालायला भेट दिल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. मागील बऱ्याच काळापासून आबे यांना आतड्याच्या सुजेने होणाऱ्या अल्सरचा त्रास आहे. आजच यासंदर्भातील निर्णय होणार असून संध्याकाळपर्यंत आबे पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा करतील असं सांगितलं जात आहे.

 

News English Summary: Japanese Prime Minister Shinzo Abe is set to resign, public broadcaster NHK said on Friday, adding that the long-serving leader wanted to avoid causing problems for the government due to the worsening of a chronic health condition.

News English Title: Japan Prime Minister Shinzo Abe health deteriorated will resign Prime Minister post News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Japan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या