ब्राझीलच्या अध्यक्षांना राम-लक्ष्मण, हनुमान, संजीवनी सर्व माहिती? हेडलाईन'मॅनेजमेंटची नेटिझन्सची टीका

नवी दिल्ली, ०८ एप्रिल: ब्राझीलमध्येही करोनाही थैमान घातलं असून आतापर्यंत हजारोंना विषाणूंची लागण झाली असून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र यानंतरही काही दिवसांपर्यंत ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो लॉकडाउनच्या विरोधात होते. जैर बोल्सोनारो यांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अर्थव्यवस्थेची चिंता जास्त सतावत होती. विशेष म्हणजे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसंबंधी बोलताना त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले होते की एक दिवस असेही आपण सगळे मरणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्यावर जगभरातून टीका झाली होती.
जैर बोल्सोनारो यांनी करोनाला अत्यंत सामान्य फ्लू म्हटलं होतं आणि त्यामुळे देशातील नागरिकांना अर्थव्यवस्था थांबता कामा नये असं आवाहन केलं होतं.जगातील देश आपल्या नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करत होते तेव्हा जैर बोल्सोनारो लोकांना वारंवार कामावर परतण्याचं आवाहन करत होते. इतकंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला मान्य करण्यास ते नकार देत होते. त्यानंतर त्यांची तुलना थेट पाकिस्तानचे पंतप्रधान अमरान खाम यांच्याशी केली गेली होती.
मात्र आता भारतातील प्रसार माध्यमांमध्ये त्यांच्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तामुळे समाज माध्यमांवर भाजपविरुद्ध टीकेची झोड उठवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच दोन देशांच्या प्रमुख नेत्यांमधील पत्रात झालेला संवाद धार्मिक स्वरूपात प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवला गेल्याचा आरोप केला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट बजरंगबली हनुमान यांच्याशी केली आहे. तर पाठवण्यात आलेले औषध हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनची तुलना संजीवनी औषधी वनस्पतीसोबत (संजीवनी बूटी) केली आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती जैर एम. बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की ‘भगवान रामचंत्र यांचा भाऊ लक्ष्मण यांचे प्राण वाचवण्यासाठी हिमालयातून औषध (संजिवनी औषधी वनस्पती) घेऊन येणारे भगवान हनुमान आणि रुग्णांना बरे करणारे येशू मसीह यांच्याप्रमाणेच भारत आणि ब्राझील मिळून या जागतिक संकटाचा सामना करतील. ब्राझीलमध्ये बुधवारपर्यंत १४ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागणं झाल्याचे समजते.
News English Summary: Brazilian President Jared M. Bolsonaro has written a letter to Prime Minister Narendra Modi. In this letter, he writes that India and Brazil will face this global crisis as Lord Hanuman, who brought medicine (Sanjeevani herbs) from the Himalayas to save God Rama’s brother Laxman’s life, and Jesus Christ who healed the sick. In Brazil, more than 14,000 people are reported to have coronary infections by Wednesday.
News English Title: Story Brazil president Bolsonaro compare PM Narendra Modi lord Hanuman Covid19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN