स्पेनमध्ये कोरोनामुळे हाहाकार; एका रात्रीत ७०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू
माद्रिद, २५ मार्च: चीननंतर आता स्पेनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने कहर केला आहे. चीनच्या पाठोपाठ आता स्पेनमध्ये मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. स्पेनमध्ये एका रात्रीत ७०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे ३,४३४ नागरिकांचा बळी गेला आहे. तर चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत ३,२८१ नागरिकांचा बळी घेतला आहे.
स्पेनच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ७३८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमधील मृतांचा आकडा ३,४३४ झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत ४७,६१० नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर स्पेनच्या राजधानीमध्ये आतापर्यंत १,५३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्पेनमध्ये ५,४०० आरोग्य कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
तर फ्रान्समध्ये कोरोनाच्या बळींची संख्या ११०० झाली आहे. फ्रान्समध्ये सलग चार दिवस १०० हून अधिक बळी जात असून २४ तासांत तिथं २४० बळी गेलेत. फ्रान्समधील मृतांचा आकडा हा केवळ रुग्णांतलांतील असून प्रत्यक्षात यापेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत, असं हॉस्पिटलच्या प्रमुखांनी म्हटलंय. घरी आणि वृद्धाश्रमात झालेल्या मृत्युंची आताच्या आकडेवारीत नोंद नाही, अशी माहिती त्यांनी दिलीय.
दुसरीकडे भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण ६०६ रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. त्यापैकी १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १२२ रुग्ण आहेत. म्हणजे प्रत्येकी पाचवा रुग्ण हा राज्यातील आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाव्हायरसची एकूण आकडेवारी जारी केली आहे. एकूण ६०६ प्रकरणांपैकी ५५३ प्रकरणं ऍक्टिव्ह आहेत, तर ४२ रुग्ण बरे झालेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
News English Summery: The deadly corona virus has now spread to Spain after China. With China now the death toll in Spain is increasing. More than 700 civilians have died in one night in Spain. So far in Spain, 3434 civilians have been killed due to corona. In China, Corona has so far killed 3281 civilians. According to the Spanish government, 738 people have died in the last 24 hours. The death toll in Spain has risen to 3434. So far 47,610 people have been infected with the Corona virus in Spain. So far in the capital of Spain, 1535 people have died. Spain has 5400 health workers working to prevent the outbreak of Corona.
News English Title: Story Corona virus Spain records 700 deaths in overnight News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या