26 January 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Bank Account Alert | पगारदारांनो, सॅलरी अकाउंट आणि सेविंग अकाउंटमधील फरक माहित आहे का, फायदा कुठे जाणून घ्या

Bank Account Alert

Bank Account Alert | एखादा व्यक्ती नवीनच एका नव्या कंपनीमध्ये नोकरीसाठी जॉईन झाला की त्याचं सॅलरी अकाउंट उघडलं जातं. कंपनीकडून खोलण्यात येणाऱ्या अकाउंटचं नाव सॅलरी अकाउंट असतं. या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या सॅलरी अकाउंटमध्ये सॅलरी पाठवण्यात येते.

कंपनीमध्ये असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे सॅलरी अकाउंट असतेच. कर्मचाऱ्याला सॅलरी अकाउंटचे भरपूर फायदे अनुभवायला मिळतात. ज्यामध्ये फ्री एटीएम ट्रांजेक्शन, ऑनलाइन अनलिमिटेड ट्रांजेक्शन त्याचबरोबर मिनिमम बॅलेन्सची सूट देखील मिळते. सेविंग अकाउंट सॅलरी अकाउंटपेक्षा अत्यंत वेगळे असते. सॅलरी अकाउंटमध्ये तुम्ही झिरो बॅलन्स ठेवला तरीसुद्धा तुमचं खातं बंद होत नाही परंतु सेविंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे अत्यंत गरजेचे असते. नाहीतर तुमच्याकडून पेनल्टी चार्ज आकारण्यात येते.

सॅलरी आणि सेविंग अकाउंटचे नियम :
1. सॅलरी आणि सेविंग अकाउंटमध्ये बँकांकडून सारखे व्याजदर तुम्हाला दिले जातात. सॅलरी अकाउंटमध्ये 4% ने व्याजदर दिले जात आहे.

2. सॅलरी अकाउंट कंपनीमध्ये काम करणारा कोणताही व्यक्ती अगदी सहजवतीच्या उघडू शकतो. त्याचबरोबर सेविंग अकाउंट उघडण्यासाठी कोणतीही अट नसते. कोणताही व्यक्ती सेविंग अकाउंट उघडू शकतो.

3. समजा तुम्ही नवीन ठिकाणी नोकरीला लागला आणि आधीच्या नोकरीचे सॅलरी अकाउंट बंद नाही केले तर, तुम्हाला त्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल.

4. त्याचबरोबर तुम्ही मिनिमम बॅलेन्स मेंटेन नाही केला तर तुमच्याकडून पेनल्टी आकारण्यात येते.

सेविंग अकाउंटबद्दल ही गोष्ट जाणून घ्या :
सेविंग अकाउंट उघडत असाल तर, तू मला खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स मेंटेन ठेवावाच लागेल. ठेवला नाही तर तुमच्याकडून पॅनल्टी अकारण्यात येईल. त्याचबरोबर बँकांकडून मिळणाऱ्या सुविधा उपभोगण्यासाठी तुमच्याकडून चार्जेस घेतले जातील.

फ्री पासबुक आणि चेकबुकची सुविधा :
सॅलरी अकाउंट मध्ये तुम्हाला बँकेकडून फ्री पासबुक मिळते. त्याचबरोबर फ्री चेकबुक आणि ई स्टेटमेंट सुविधा देखील प्राप्त होते. त्याचबरोबर एसएमएस अलर्टचे कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत.

सॅलरी अकाऊंटचे हे फायदे देखील जाणून घ्या :
सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला फ्री एटीएम ट्रांजेक्शन दिले जाते. त्याचबरोबर तुम्ही कितीही वेळा एटीएम ट्रांजेक्शन केलं तरीही काही फरक पडत नाही. अशातच एटीएम ट्रांजेक्शनकरिता बँक तुमच्याकडून कोणतेही चार्जेस घेत नाही. सॅलरी अकाउंट असेल तर पर्सनल लोनसाठी भरपूर ऑफर्स तुम्हाला मिळतात. त्याचबरोबर होम लोन आणि कार लोनकरिता देखील चांगल्या सुविधा मिळतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x