
CIBIL Vs Credit Score | प्रत्येक ठिकाणाची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी किंवा इतर बँकांमध्ये कर्जासाठी मागणी करणाऱ्या व्यक्तीचा सर्वप्रथम सिबिल स्कोर तपासला जातो. ज्या व्यक्तीच्या सिबिल स्कोरने उच्चांक गाठलेला असतो त्यालाच चांगल्या दर्जाचे लोन प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही लोन संबंधितचे सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर हे दोन शब्द कुठे ना कुठे नक्कीच ऐकले असतील.
बऱ्याच व्यक्ती क्रेडिट स्कोर आणि सिबिल स्कोर या दोन शब्दांमध्ये प्रचंड कन्फ्युज असतात. आज आम्ही या दोन्हीही शब्दांचा अर्थ समजावून सांगणार आहोत. सांगायचं झालं तर ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड या आधी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड सिबिल म्हणून ओळखली जायची. ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे.
याव्यतिरिक्त सीआरआयएफ, एक्सपिरियन, हाय मार्क आणि इक्वीफॅक्स या देखील तीन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत आणि म्हणूनच क्रेडिट स्कोर हे एक महत्त्वपूर्ण मॅट्रिक मानले गेले आहे. हा क्रेडिट स्कोर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या कर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी ठरतो.
असा ठरवतात सिबिल स्कोर :
सिबिल स्कोर हा कर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासण्यासाठी महत्त्वाचा असतो. ही हिस्ट्री तो तीन अंकांमध्ये सांगतो. अशातच सीबिल स्कोर हा 300 ते 900 या रेंजमध्ये असतो. समजा तुम्हाला कोणतही कर्ज घ्यायचं असेल तर, तुमचा सिबिल स्कोर 750 च्या आसपास असणे चांगले मानले जाते. मध्ये ज्या व्यक्तीचा जेवढा जास्तीत जास्त स्कोर असेल तितकीच ती गोष्ट चांगली असते. जास्तीच्या सिबिल स्कोरमुळे तुम्हाला लोन घेण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही.
सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोरमध्ये नेमका काय फरक :
सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर या दोघांमधील फरक साध्या शब्दांचा सांगायचं झालं तर, क्रेडिट स्कोरच्या वापराने आपण एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक क्षमतेचं मूल्यांकन काढू शकतो. त्याचबरोबर सिबिल स्कोर हा देशातील सिबिल क्रेडिट ब्युरोमार्फत पाहिला जातो. त्याचबरोबर सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान असतो ज्यामध्ये व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्रीसह लोन परतफेडीची सर्व काही माहिती नमूद केलेली असते.