11 December 2024 9:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल

Highlights:

  • Credit Card Application
  • 750 सिबिल स्कोर असेल तर त्वरित क्रेडिट कार्ड मिळते :
  • कोण कोणत्या कारणांमुळे सिबिल स्कोर खराब होतो :
  • सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर कोण कोणत्या नुकसानांना सामोरे जावे लागते :
Credit Card Application

Credit Card Application | तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना क्रेडिट कार्डने ट्रांजेक्शन करताना बऱ्याचदा पाहिलं असेल. हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे अत्यंत गरजेचे आहे. सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला भविष्यात कोणत्याही मोठ्या कर्जाचे लोन घ्यायचे असेल तर, फायद्याचे ठरते. क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्याचबरोबर सिबिल स्कोर कशा पद्धतीने वाढविला पाहिजे त्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत.

750 सिबिल स्कोर असेल तर त्वरित क्रेडिट कार्ड मिळते :
तुमचा सिबिल स्कोर हा 300 ते 500 दरम्यान असल्यास तुम्हाला कधीच क्रेडिट कार्ड मिळणार नाही. सिबिल स्कोरचा हा तीन अंकी क्रमांक 300 ते 900 पर्यंत असतो. यामधील तुमचा सिबिल स्कोर 750 ते 900 च्या दरम्यान असेल तरच तुम्ही क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता.

कोण कोणत्या कारणांमुळे सिबिल स्कोर खराब होतो :
बऱ्याच व्यक्ती अनेक ठिकाणाहून कर्ज घेऊन कर्जबाजारी होऊन बसतात. त्याचबरोबर ईएमआय, आणि बिले फेडण्यास विलंब करतात. अशावेळी तुमचा सिबिल स्कोर प्रचंड खराब होतो. या कारणामुळे तुम्हाला लोन मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

1) ज्यावेळी तुम्ही एखादी वस्तू ईएमआयवर खरेदी करता त्यावेळी प्रत्येक महिन्याला ईएमआयचे पेमेंट होणे गरजेचे असते. तुमच्याकडून ईएमआय जास्त वेळा चुकला असेल म्हणजेच भरला गेल्याचा बाकी असेल तर तुमचा सिबिल स्कोर ढासळू शकतो.

2) काही व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घेतात. बऱ्याचदा जास्तीची गरज घेऊन ते फेडत असताना आणखीन गरजेसाठी बँकेकडून पुन्हा कर्ज घेतात. परंतु आधीचे कर्ज फेडले न गेल्यामुळे पुन्हा कर्ज घेतल्यानंतर ते कर्ज वेळेवर फेडणे कठीण होऊन बसते. या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींचे सिबिल स्कोर खराब होतात.

3) वारंवार लोन घेण्यासाठी अप्लाय केल्याने तुमचा सिबिल स्कोर कमी होतो. काही व्यक्ती एकापेक्षा जास्त बँकांकडून लोन घेतात परंतु अशा बँकांकडूनच तुमच्या सिबिल स्कोरची हार्ड इंक्वायरी केली जाते. हार्ड इन्क्वायरीमुळे तुमचा सिव्हिल स्कोर आणखीन कमी होऊ शकतो.

4) तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने जास्तीची खरेदी केली तर, तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. बऱ्याच व्यक्ती क्रेडिट कार्डच्या लिमिटपेक्षा जास्त खरेदी करतात. परंतु तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या लिमिटपेक्षा 30% लिमिट पर्यंतच खरेदी केली पाहिजे. नाहीतर तुमचा सिव्हिल स्कोर खराब होण्याची शक्यता वाढू लागेल.

सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर कोण कोणत्या नुकसानांना सामोरे जावे लागते :

1) तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर, कोणतीही वित्तीय संस्था किंवा बँक तुम्हाला लोन देऊ शकणार नाही. कारण की सिबिल स्कोर कमी असणे म्हणजेच तुमचा बेजबाबदारपणा बँकेला किंवा संबंधित कंपनीला दिसतो. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते.

2) समजा तुमचा सिबिल स्कोर प्रचंड खराब आहे आणि तरीसुद्धा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला लोन देऊ इच्छिते. तर, यामध्ये तुमचे जास्तीचे नुकसान होते. कारण की संबंधित कंपनी तुमच्याकडून लोनच्या बदल्यात जास्तीचे व्याजदर आकरते. त्यामुळे कंपनीला नाही परंतु तुम्हाला नुकसानाचा चांगलाच फटका बसेल.

3) तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर, तुम्हाला इन्शुरन्स काढण्यासाठी देखील अडथळे निर्माण होतील. कारण की कमी सिबिल स्कोर असलेल्या व्यक्तींना कंपन्यांकडून इन्शुरन्स दिले जात नाही. काही इन्शुरन्स कंपन्या मदत तर करतात परंतु तुमच्याकडून जास्तीचे प्रीमियम आकारतात.

4) सिबिल स्कोर खराब झाल्यामुळे तुम्हाला होम लोनसह कार लोन घेण्यासाठी देखील अडथळा निर्माण होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला जास्तीचे व्याजदर भरावे लागू शकते. जास्तीचे व्याजदर भरावे लागतील यासाठी तुमच्याकडे रोजच्या खर्चासाठी कोणतीही रक्कम शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सिबिल स्कोर कशा पद्धतीने चांगला होईल याकडे लक्ष द्या.

Latest Marathi News | Credit Card Application 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Credit Card Application(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x