
EPF Pension Money | केंद्र सरकारकडून 24 ऑगस्ट रोजी ( UPS ) म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम लॉन्च करण्यात आली आहे. ही एक प्रकारची रिटायरमेंट योजना आहे परंतु अद्याप ही योजना सरकारकडून लागू करण्यात आलेली नाहीये. ही योजना थेट 2025 च्या एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून लागू करण्यात येणार आहे.
ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानावर एक निश्चित आणि समाधानकारक पेन्शन प्राप्त करून देणार आहे. योजना लॉन्च झाल्याची बातमी तर सर्वांनाच माहित आहे परंतु या योजनेचे नेमके कोणकोणते फायदे अनुभवता येणार याचे शाश्वती अनेकांना नाहीये. आज आम्ही या बातमीतून सर्वांचे प्रश्न, शंका-कुशंका दूर करणार आहोत. यामध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त परंतु 25 वर्षांपेक्षा कमी कामाचे योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांना कमाल 10,000 रुपयांपासून पेन्शन सुरू होणार. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बेसिक सॅलरीवर कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार याचा आढावा घेऊया.
कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 70,000 रुपये असेल तर किती पेन्शन मिळेल :
समजा एखादा कर्मचारी 70 हजार रुपये प्रति महिना पगार घेत असेल तर त्याला पेन्शन स्वरूपात 35000 DA मिळेल. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना 21 हजार रुपये DA मिळणार. ही नवीन योजना केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांवर लागू होणार आहे. योजना सुरू करण्यामागचे एकमेव उद्दिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केलेली मदत असणार आहे.
UPS मध्ये कर्मचाऱ्याकडून आणि सरकारकडून होणारे योगदान किती :
यूपीएस योजनेअंतर्गत सरकार कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी आणि डीए मधील 18.4% योगदान करेल. त्याचबरोबर कर्मचारी त्याच्या पगारातील 10 टक्के आणि डीए योगदान करेल. समजा कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 60 हजार रुपये आहे तर निवृत्तीनंतर त्याला 30000 महिन्याला पेन्शन प्राप्त होईल. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा अकाळी मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना प्रति महिना 18000 रुपये पेन्शन स्वरूपात देण्यात येतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.