 
						EPFO Login | ईपीएफ म्हणजेच एम्पलोइज प्रॉव्हिडंट फंड. ही योजना नोकरी पेशा असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. ही योजना ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन या संस्थेअंतर्गत चालवली जाते.
नोकरी करणारा कोणताही व्यक्ती ईपीएफच्या माध्यमातून लाखो करोडोंचा फंड जमा करू शकतो. यामध्ये तुम्हाला वेगळे असे पैसे गुंतवावे लागत नाही. सेट पगारातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढून तुमच्याच ईपीएफ खात्यात जमा केली जाते. यामुळे भविष्यात मोठा कॉर्पस जमा करण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर रिटायरमेंटनंतर तुम्ही कमवलेले पैसे एखाद्या मंथली इनकम स्कीममध्ये देखील आरामशीर गुंतवू शकता. जेणेकरून रिटायरमेंट नंतरच आयुष्य अगदी आरामात जाईल.
ईपीएफ करेल रिटायरमेंटनंतरच टेन्शन दूर :
जर आपण आतापासूनच रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याचा विचार केला तर, महागाई लक्षात आपल्याला 1.5 किंवा 2 करोडोंचा फंड तयार करावा लागेल. परंतु आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण तुम्ही ईपीएफच्या माध्यमातून भडगंज रक्कम कमवू शकता. ईपीएफ खात्यामध्ये कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या योगदान इतकेच नियुक्ताचे आणि कंपनीचे योगदान असते. हे संपूर्ण योगदान तुमच्या बेसिक सॅलरीवर ठरत असते. त्याचबरोबर सध्याच्या घडीला ईपीएफ अकाउंटवर 8.25% ने व्याजदर दिले जात आहे.
अकाउंट डिपॉझिटचे नियम जाणून घ्या : 
1. कर्मचाऱ्याला ईपीएफ खात्यात बेसिक सॅलरी + महागाई भत्ता DA मिळून जेवढा पगार तयार होतो त्या पगाराचा 12% भाग ईपीएफ खात्यात द्यावा लागतो.
2. कर्मचाऱ्या एवढेच योगदान कंपनी किंवा नियुक्तांकडून केले जाते. यामध्ये कंपनीच्या योगदानातून ईपीएस खात्यात 8.33% आणि ईपीएफ खात्यात 3.67% जमा केले जाते.
3. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचं वय 25 वर्ष आहे आणि त्याला बेसिक पगार 25,000 रुपये आहे तर, रिटायरमेंटपर्यंत किती रुपयांचा फंड जमा होईल.
कॅल्क्युलेशन पाहून घ्या :
1) कर्मचाऱ्याचे वय : 25 वर्ष
2) रिटायरमेंट होण्याची वय : 60 वर्ष
3) मूळ पगार आणि DA : 25,000 रुपये
4) कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान : 12%
5) कंपनीकडून होणारे योगदान : 3.67%
6) वार्षिक इन्क्रिमेंट : 6%
7) योगदानाची रक्कम : 55,99,680
8) पीएफवर मिळणारे व्याजदर : 8.25%
9) व्याजाचा फायदा : 1,52,23,250
10) रिटायरमेंटपर्यंत जमा होणारा फंड : 2,08,22,930
अशा पद्धतीने व्याजदर कॅल्कुलेट केले जाईल :
कर्मचाऱ्या 25 हजाराच्या बेसिक सॅलरीतून 12% रक्कम म्हणजे 3,000 रुपये. त्यानंतर कंपनीचे 3.67% ने ईपीएफमधील योगदान 917.50. त्याचबरोबर ईपीएसमधील योगदान 8.33% म्हणजे 2082.50 रुपये. म्हणजे तुमच्या ईपीएफ खात्यात प्रत्येक महिन्याला 3817.50 रुपये जमा होत राहतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		