
EPFO Login | ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघठन ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य अगदी आनंदात आणि सुखात घालवता येईल. ईपीएफओ खात्यात कर्मचारी नोकरी, व्यवसायाला असतानाच खात्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. एखाद्यामध्ये कर्मचाऱ्याचा आणि कंपनीचा असा दोघांचा मिळून हिस्सा जमा केला जातो.
दरम्यान EPFO संस्थेमध्ये पैसे गुंतवणाऱ्या नोकरदारांना सरकार चांगले व्याजदर प्रदान करत आहे. त्याचबरोबर ईपीएफओ अंतर्गत अनेक प्रकारच्या योजना असतात. या खात्यामध्ये पैसे गुंतवून आणि चांगले व्याजदर कमावून तुम्ही तुमचं भविष्य उज्वल करू शकता.
तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून तीन ते पाच करोड रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला या लेखातून सरकार किती टक्के व्याज देते, आणि तुम्ही या योजनेतून करोडो रुपये कसे कमवू शकता याबद्दल सांगणार आहोत.
सरकार किती व्याज देत आहे?
केंद्र सरकार अंतर्गत ईपीएफओ खात्याचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षाला 8.25% व्याजदराने दर दिला जात आहे. या व्याजदराची विशेष गोष्ट म्हणजे पीएफ खात्यात डिपॉझिट व्याजावर कोणतेही टॅक्स आकारले जात नाही. कारण की ही एक टॅक्स फ्री स्कीम असून प्रत्येक भारतीय नागरिकाला या स्कीमचा फायदा घेता येणार आहे.
तुम्हाला 3 ते 5 करोड रुपये कमवायचे असतील तर, किती कॉन्ट्रीब्युशन कराल?
समजा तुम्हाला तुमच्या खात्यातून 5 करोड रुपये जमा करायचे असतील तर, चाळीस वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक महिन्याला 12,000 रुपये खात्यामध्ये गुंतवावे लागतील. ही रक्कम 8.25% टक्क्यांच्या हिशोबाने 5,08,70,991 कोटी एवढी जमा होईल. तुमच्या रिटायरमेंट नंतरचा काळ सुखात जाण्यासाठी ही इन्वेस्टमेंट बेस्ट राहील.
समजा तुम्हाला 4 करोड रुपये हवे असतील तर प्रत्येक महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल. तर, सलग चाळीस वर्षांपर्यंत तुम्हाला 11,200 रुपये गुंतवावे लागतील. 8.25% व्याजदरानुसार मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यानंतर 4,02,59,738 एवढी मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.
तुम्हाला 3 करोड रुपये यांपर्यंत फायनल अमाऊंट हवी असेल तर, व्याजदरानुसार मॅच्युरिटी पीरियडपर्यंत दरमहा 8,400 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर तुम्हाला 3,01,94,804 एवढी रक्कम मिळेल.
आपातकालीन परिसस्थितीत फंड काढून घेण्याची मुभा :
ईपीएफओमध्ये तुम्ही तुमच्या कठीण काही पैसे काढून ते वापरू शकता. म्हणजेच ईपीएफओने ही सुविधा देखील कर्मचाऱ्यांना दिली आहे. फक्त एमर्जेंसीच्या काळातच नाही तर, लग्न खर्चासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी तुम्ही दिलेल्या तरतुदी पूर्ण करून फंड काढून घेऊ शकता.