2 May 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी खुशखबर, आता UPI ने झटपट EPF चे पैसे काढता येणार, अपडेट जाणून घ्या

EPFO Money Alert

EPFO Money Alert | EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन’ EPFO अंतर्गत खाजगी कर्मचाऱ्यांसाठी विविध सुख सोयी कशा आणल्या जातील त्याचबरोबर पेमेंटचे पर्याय खातेधारकांसाठी सोप्या पद्धतीने कसे करता येईल याची काळजी ईपीएफओ घेते. सध्याच्या घडीला पीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच खातेधारकांना EPF खात्यातील पैसे काढण्यासाठी UPI म्हणजेच ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ पर्याय उपलब्ध होणार आहे.

सरकार अशा पद्धतीने काम करत आहे की, UPI प्रणालीद्वारे EPF खातेधारकांना खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. सरकारचे एकच धोरण आहे ते म्हणजे पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया जलद गतीने पार पडावी.

मिळेल डिजिटल व्यवहारांना चालना :
1. EPFO ने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यात UPI प्लॅटफॉर्मवर पैसे काढण्यासंबंधीतची सुविधा सुरू करणार असल्याचा समजत आहे. कारण की, NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत ईपीएफओ संस्थेची आपापसात चर्चा सुरू आहे.

2. कर्मचाऱ्यांचे ईपीएफओ खाते UPI शी जोडले गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना थेट त्यांच्या यूपीआय वॉलेटमधून पीएफ खात्यातील पैसे काढता येणार आहेत. ईपीएफओ प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी कामगार मंत्रालय, भारतीय रिझर्व बँक आणि इतरही व्यवसायिका बँका सुधारणेसाठी हातभार लावत आहेत.

3. जे व्यक्ती दुर्गम भागामध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी ईपीएफओने तयार केलेली ही नवीन प्रणाली अत्यंत लाभदायक आणि जलद गतीने पैसे मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आता कर्मचाऱ्यांना गरजेवेळी पैसे काढण्यासाठी क्षणाची ही वाट पहावी लागणार नाही. लगेचच हवे तेवढे पैसे काढता येणार आहेत.

गुंतवणुकीच्या पद्धतीत नेमका कोणता बदल होणार :
ईपीएफओ लवकराच आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीत देखील बदल करणार असल्याची माहिती माध्यमांकडून समजत आहे. यामध्ये कर्जाची गुंतवणूक 20 टक्क्यांहून थेट 10% पर्यंत आणण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या सर्व गोष्टींसाठी कामगार मंत्रालय लवकरच अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळवणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Money Alert(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या