
EPFO Passbook | खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयीची संपूर्ण माहिती ईपीएफओ खात्याकडे असते. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत एका नवीन सुविधेचा अवलंब केला गेला आहे. आता कोणताही कर्मचारी लग्न खर्चासाठी, शिक्षणासाठी, घर खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या कामांसाठी अगदी सहजरीत्या खाजातून पैसे काढू शकणार आहे.
नवीन सुविधेमध्ये 68K नियमाच्या अंतर्गत लग्न खर्च आणि शैक्षणिक खर्च, त्याचबरोबर नियम 68B अंतर्गत खर खरेदीसाठी ऑटो सेटलमेंट सुविधा सुरू करण्यात आली आहे. आपत्कालीन घटनांसाठी पैसे काढण्याची लिमिट वाढवली आहे. म्हणजेच पैसे काढण्यासाठी तुम्ही 1 लाख रुपये काढू शकता.
ऑटो प्रोसेसिंगमुळे जलद होणार क्लेम सेटलमेंट :
ईपीएफ क्लेम प्रोसेस करण्यासाठी बऱ्याचदा जास्तीचा वेळ घेतो. कारण की, यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण गोष्टी तपासून पाहण्यासाठी जास्त वेळ लागतो. ज्यामध्ये क्लेम करण्यासाठी म्हणजेच पैसे काढण्यासाठी लागणारी महत्त्वाचे कागदपत्रे, केवायसी, व्हॅलिड बँक अकाउंट नंबर. त्यांसारख्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच ईपीएफमधून तुम्हाला क्लेम करता येतं.
ऑटो प्रोसेसिंग सेटलमेंट ही प्रक्रिया सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत आयटी सिस्टम चालवते. म्हणजेच आयटी सिस्टमअंतर्गत ऑटो प्रोसेसची संपूर्ण प्रक्रिया सुरू असते. दरम्यान बँक पडताळणी आणि केवायसी तपासणीसह आयटी टूल द्वारे कोणताही दावा पेमेंट प्रक्रियेसाठी केला जाईल. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे काढण्यासाठी आधी 10 दिवसांचा काळ होता. आता हा काळ कमी करून 3 ते 4 दिवसांपर्यंत कमी केला आहे.
अनेकांना होईल फायदा :
अनेक ज्येष्ठ व्यक्तींचं असं म्हणणं आहे की, शिक्षण, लग्न आणि घर खर्चासाठी ऑटो सेटलमेंट सुविधाच्या सुरुवातीपासून लवकरात लवकर दावा निपटण्यासाठी मदत मिळेल. ईपीएफ नियमांच्या 68J नुसार सर्व दावे स्वीकारून 1 लाख रुपयांची रक्कम काढण्यास सक्षम आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.