
EPFO Passbook | ईपीएफ म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड. या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फंड एक रिटायरमेंट फंड आहे. समजा तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून गरजे वेळी कधीही पैसे काढले नाही आणि फंड सातत्याने सुरू ठेवला तर, तुम्ही लवकरात लवकर एक मोठी रक्कम मिळवू शकता.
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड हे ईपीएफमार्फत चालवले जाते. ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्यांच्या पगारातील एक भाग प्रत्येक महिन्याला गुंतवला जातो. या पैशांमुळे तुम्ही तुमच्या म्हातारपणाचा आयुष्य सुरक्षित करू शकता.
ईपीएफ खात्यामुळे रिटायरमेंटची चिंता मिटली :
जर आत्तापासून रिटायरमेंट फंडाचा विचार केला तर, तुम्ही रिटायरमेंट घेतल्यानंतर तुमच्याजवळ 2 करोड किंवा दोनपेक्षा जास्त कॉर्पस तयार झालेला असावा. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला नियमितपणे ईपीएफ खात्यात योगदान देत असाल तर, तुम्हाला तुमच्या बेसिक सॅलरीवरून अचूक हिशोब काढता येईल. कर्मचाऱ्यांच्या एपीएफ खात्यात त्यांच्या पगाराएवढेच योगदान नीयोक्ता आणि कंपनीकडून केली जाते. त्याचबरोबर ईपीएफ खात्यात जमा असणाऱ्या रक्कमेवर तुम्हाला वार्षिक आधारावर व्याज देखील मिळते. सध्याच्या घडीला व्याजाचे दर 8.25% आहे.
अकाउंटमधील डिपॉझिटचे नियम देखील जाणून घ्या :
ईपीएफओशी जोडले गेलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या बेसिक सॅलरीतील महागाई भत्ता मिळवून 12% योगदान द्यावे लागते. त्याचबरोबर कंपनी देखील दोन भागांमध्ये योगदान देते एक म्हणजे ईपीएफ आणि दुसरं म्हणजे ईपीएस. ईपीएसमध्ये 8.33% तर, ईपीएफ खात्यात 3.67% योगदान दिले जाते.
पुढील कॅल्क्युलेशन पाहून घ्या :
समजा एखाद्या व्यक्तीचे वय 25 वर्ष आहे आणि त्याला 30,000 बेसिक सॅलरी + DA मिळत असेल तर, रिटायरमेंटपर्यंत किती फंड तयार होईल पाहू.
1. कर्मचाऱ्याचे वय : 25 वर्ष
2. मूळ पगार + DA : 30,000
3. निवृत्तीपर्यंतचे वय : 58 वर्ष
4. कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान : 12%
5. कंपनीकडून होणारे योगदान : 3.67%
6. वार्षिक इन्क्रिमेंट : 8%
7. EPF वर मिळणारे वार्षिक व्याज : 8.25%
8. एकूण गुंतवणूक : 55,99,680
9. व्याजातून झालेला फायदा : 1,52,23,250
10. रिटायरमेंट फंड : 2,25,88,720 म्हणजेच तुमच्या खात्यात एकूण 2.25 करोड रुपयांचा फंड तयार होईल.
व्याजाचे कॅल्क्युलेशन कसे होते :
1. मूळ पगार + DA म्हणजेच महागाई भत्ता : 25,000
2. EPS मधील कर्मचाऱ्याचे योगदान 25000 चे 12% म्हणजेच : 3000 रूपये
3. कंपनीकडून होणारे योगदान 25000 चे 3.67% म्हणजेच : 917.50
4. कंपनीचे ईपीएसमधील योगदान 25000 चे 8.33% : 2082.50 रूपये
5. EPF खात्यातून प्रत्येक महिन्याला होणारे योगदान : 3000 + 917.50 = 3817.50 रूपये
EPF खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी काय करावे :
तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातील बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करून चेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही उमंग
ॲपद्वारे देखील शिल्लक चेक करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.