23 April 2025 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
x

EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO पेंशन मिळणार नाही, अपडेट समजून घ्या, अन्यथा EPF पेन्शन विसरा

EPFO Pension Money

EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचारी ईपीएफओ (EPFO) सदस्यांच्या खात्यातून दरमहा जे योगदान जाते, ते 2 भागांमध्ये विभागले जाते. एक त्यांच्या ईपीएफ खात्यात जाते आणि दुसरे पेन्शन खात्यात. जर सातत्याने 10 वर्षांपासून कोणताही सदस्य खात्यात योगदान चालू ठेवत असेल तर त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेंशन मिळते. ईपीएस 95 पेन्शन योजना (EPS 95 Scheme) तत्त्वानुसार निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षे आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना 58 वर्षांच्या वयात पेन्शनचा लाभ घेता येतो.

पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले जाते (PPO Number)
पेन्शनचा फायदा घेणाऱ्यांना ईपीएफओ कडून पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले जाते. याला पीपीओ क्रमांक असे म्हणतात. हा क्रमांक १२ अंकांचा असतो. पेन्शनसाठी हा क्रमांक खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही हा क्रमांक विसरला किंवा हा तुमच्यापासून मिस झाला तर तुमचे अनेक कामे अडकू शकतात. हे पुन्हा कसे मिळवायचे ते जाणून घ्या.

पेन्शनसाठी पीपीओ नंबर महत्त्वाचा का आहे?
पीपीओ नंबर एक युनिक ओळख नंबर असतो, जो प्रत्येक पेन्शनधारकाला दिला जातो. पेन्शनशी संबंधित सर्व व्यवहार जसे कि पेन्शन भरणा ट्रॅक करणे, तक्रार नोंदविणे आणि जीवन प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी अनेक ठिकाणी पीपीओ नंबरची आवश्यकता असते. जर आपण ईपीएफ खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकत ट्रान्स्फर असाल तर यासाठीही PPO नंबरची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पासबुकमध्ये पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर नोंदलेले असावे याची काळजी घ्या.

जर पीपीओ नंबर हरवला असेल तर पुन्हा मिळवू शकता
जर तुमचा पीपीओ नंबर हरवला आहे किंवा तुम्ही तो विसरला आहात तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तो पुन्हा मिळवू शकता. पुन्हा प्राप्‍त करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

* सर्वप्रथम ईपीएफओची अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in वर जा.
* येथे होम पेजवर जाऊन ऑनलाइन सेवा मध्ये तुम्हाला ‘Pensioners’ Portal’चा पर्याय दिसेल, त्यावर जाऊन.
* आता डाव्या बाजूला ‘Know Your Pension Status’ पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
* यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर डाव्या बाजूला ‘Knows your PPO No’ ऑप्शन दिसेल.
* यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या EPF संबंधित बँक खात्याचा किंवा पीएफ क्रमांकाचा समावेश करून सबमिट करणे आवश्यक आहे.
* सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा पीपीओ नंबर येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Money(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या