
Home Loan Alert | अगदी फ्लॅटपासून ते बैठ्या घरापर्यंत सर्वच जमिनींचा आणि मालमत्तेचा रेट हाय झाला आहे. घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असून तुम्ही कितीही सेविंग केली असेल तरीसुद्धा आजच्या मूल्य भावानुसार तुम्हाला घरासाठी कर्ज काढावंच लागत आहे.
व्यक्ती घर खरेदी करण्यासाठी लोन तर घेतात परंतु काही चुकांमुळे त्यांना भविष्यात फार मोठ मोठ्या अडचणींना आणि नुकसानांना सामोरे जावे लागते. आज आपण याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
घराचा बजेट :
घर खरेदी करणारे व्यक्ती बऱ्याचदा एक मोठी आणि कॉमन चूक करून बसतात. ती म्हणजे घराचा बजेट. एकतर काही व्यक्ती घराचा बजेट बनवत नाहीत किंवा बनवलेल्या बजेटमध्ये घर घेत नाही. जर, घराचा बजेट बाहेर जात असेल तर, तुम्ही ती ऑफर नाकारून तुमचा बजेटनुसार घर खरेदी केलं पाहिजे. नाहीतर तुमचा संपूर्ण आर्थिक खर्च कोलमडून पडू शकतो. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक घर असतं. त्याचबरोबर बजेटबद्दल आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर, तुमचा EMI तुमच्या पगाराच्या 35% टक्क्यांपेक्षा अधिक नसला पाहिजे.
क्रेडिट स्कोर :
तुम्ही कोणताही लोन घ्या बँक सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर तपासते. तुमचा क्रेडिट स्कोर 700 हून अधिक असेल तरच बँक तुम्हाला लोन देण्यास होकार देते. समजा तुमच्याकडे क्रेडिट स्कोरमध्ये कोणत्याही प्रकारची चुकी झाली असेल तर सर्वप्रथम ती चूक सुधारा आणि मगच लोन घेण्यास बँकेमध्ये जा. तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह पॉईंट न दिसण्यासाठी तुम्हाला बाकी पेमेंट भरून टाकावे लागतील.
बँकेची तोल मोल न करणे :
बरेच व्यक्ती दोन घेताना बँकेबरोबर कोणत्याही प्रकारचे तोल मोल करत नाहीत. परंतु असं करण्याचं चुकीचं आहे. तुम्हाला बँकेबरोबर डिस्काउंटकरिता बोलणं करावे लागेल. तरच तुम्हाला थोडाफार प्रमाणात सूट दिली जाईल. असं केल्याने तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा अनुभवता येईल.
बॅकअप न करणे :
बहुतांश व्यक्ती बॅकअपसाठी थोडे सुद्धा पैसे बाजूला काढून ठेवत नाहीत. परंतु ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पगारातील एक भाग इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला काढून ठेवला पाहिजे. त्याचबरोबर बॅकअप अशा पद्धतीचे असावे की, पुढील 6 महिने अतिशय आरामात जाऊ शकतील. समजा तुम्ही अशा पद्धतीचा बॅकअप ठेवला तर, अचानक येणाऱ्या संकटांना तुम्हाला सामोरे जाता येईल आणि पैशांची अडचण मुळीच भासणार नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.