 
						Home Loan Benefits l आज देशातील स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत, आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी करण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. म्हणूनच बँका आणि इतर वित्तीय संस्था महिलांसाठी विशेष गृहकर्जाचा लाभ देत आहेत आणि वेळोवेळी महिलांना त्यांचे घर बांधण्यासाठी विशेष योजना आणत आहेत. जर तुम्ही नोकरदार आणि सक्षम महिला असाल तर गृहकर्जासाठी अर्ज करताना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.
सहकर्जदार म्हणून महिलांचे फायदे
महिला कर्जदार आणि सहकर्जदार म्हणून अर्ज करू शकतात. कर्जदार आणि सह-कर्जदार यांच्या एकत्रित उत्पन्नामुळे कर्ज मिळण्याची शक्यता वाढू शकते, याचा अर्थ उच्च कर्ज पात्रता आणि कुटुंबासाठी योग्य घर निवडण्यात अधिक लवचिकता आहे. याशिवाय महिलांना गृहकर्जाच्या परतफेडीवरील कर कपातीचा ही लाभ मिळतो, मुद्दलावर जास्तीत जास्त दीड लाख रुपये आणि व्याजावर दोन लाख रुपयांची वजावट मिळते.
कमी मुद्रांक शुल्क
केंद्र आणि राज्य सरकारही महिलांना घराच्या मालकीहक्कासाठी प्रोत्साहन देत आहे. महिलांसाठी गृहकर्जाच्या लाभांमध्ये अनेक राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्क 1-2% टक्के कमी केले आहे. त्यामुळे ८० लाख रुपयांच्या मालमत्तेची नोंदणी करताना एका महिलेची 80,000 ते 1,60,000 रुपयांची बचत होऊ शकते.
गृहकर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता
एचडीएफसी बँकेच्या म्हणण्यानुसार, जर ग्राहक अर्जदार/ सह-अर्जदार म्हणून महिला असेल तर त्याचा गृहकर्ज मंजुरीच्या शक्यतेवर सकारात्मक परिणाम होतो. यामागे काही विशिष्ट कारणे आहेत, ज्यात महिलांची शिस्तबद्ध बचतीची सवयी, अनावश्यक कर्ज टाळण्याची प्रवृत्ती आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आकडेवारी दर्शविते की महिला कर्जदारांमध्ये डिफॉल्ट रेट कमी आहे, ज्यामुळे गृहकर्ज देण्याबद्दल वित्तीय संस्थांचा विश्वास आणखी वाढतो.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		