18 January 2025 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा
x

Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे

Home Loan EMI

Home Loan | प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती साकार करायची असते. यासाठी अनेकजण एक रक्कम पैसे देऊन घर खरेदी करू पाहतात तर, काही व्यक्ती गृहकर्ज काढून EMI वर घर खरेदी करतात आणि प्रत्येक हप्ता भरून कर्ज फेडतात.

अशातच गृहकर्जावर व्याजाचे हप्ते तसेच प्रोसेसिंग फी आणि इतरही बरेच चार्जेस वसूलले जातात. या चार्जेसबद्दल बऱ्याच व्यक्तींना ठाऊक नसते. त्याचबरोबर बँक देखील कर्जदाराला काही गोष्टी सांगण्यास कानकुचकेपणा करते. परंतु तुम्ही पहिल्यांदाच लोन घेत असाल तर, या 6 गोष्टींची काळजी आवर्जून घ्या.

लॉगिन चार्जेस :

बऱ्याच बँका होम लोनसाठी अप्लाय करणाऱ्या व्यक्तींवर उपयोजन शुल्क म्हणजेच लॉगिन चार्जेस घेतले जातात. लोनसाठी अप्रूव करण्याकरिता हे चार्जेस घेतले जातात. त्याचबरोबर ही फी तुमच्या प्रोसेसिंग फीमध्ये ऍडजस्ट केली जाते. हे चार्जेस जवळपास 2500 ते 6500 रूपयांपर्यंत असते. समजा तुमचे लोन अप्रूव झाले नाही तर, तुम्हाला बँकेकडून हे पैसे पुन्हा मिळत नाहीत.

लीगल चार्जेस :

बऱ्याच व्यक्तींना लीगल चार्जेस कोणत्या कारणासाठी आकरले जातात हेच ठाऊक नसतं. बँकेकडून काही निवडक विशेषतज्ञांना नियुक्त केले जाते. हे विशेषतज्ञ प्रॉपर्टीशी निगडित संपूर्ण गोष्टी तपासून पाहतात. ज्यामध्ये प्रॉपर्टीवर कोणताही प्रकारची अडचण तर नाही ना, या प्रॉपर्टीची ओनरशिप लीगल तर आहे ना या सर्व गोष्टींची पूर्तता केली जाते. या सर्व गोष्टींकरिता बँक नियुक्तांना पैसे देण्याकरिता लीगल चार्जेस आकरते.

स्विचिंग चार्जेस :

स्विचिंग म्हणजे लोन एका लोन वरून दुसऱ्या लोनवर स्विच करणे होय. समजा एखाद्या व्यक्ती फिक्स रेट लोनला फ्लोटिंग रेट लोनमध्ये आणि फ्लोटिंग रेट लोनला फिक्स रेट लोनमध्ये कन्व्हर्ट केले जाते. या गोष्टीला कन्वर्जन चार्ज म्हणजेच स्विचिंग चार्ज असं म्हणतात. हे स्विचिंग चार्ज तुमच्या लोनच्या 3 टक्क्यांपर्यंत असू शकते.

फोरक्लोजर चार्ज :

फोरक्लोजरशी निगडित प्रत्येक बँकेचे वेगवेगळे नियम असतात. शक्यतो होम लोन प्री-पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत. परंतु तुम्ही टेनॉर पूर्ण होण्याआधीच संपूर्ण पेमेंट केलं तर, बँक तुमच्याकडून फोरक्लोजर चार्जेस घेऊ शकते.

रिकवरी चार्ज :

बँकेकडून होम लोन घेतल्यानंतर तुम्ही ठरवलेल्या तारखेवर परतफेड करत नसाल तर, बँक तुमच्याकडून रिकवरी चार्जेस वसूलते. अशा परिस्थितीत बँक तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित करते. बऱ्याचदा बँकांकडून ग्राहकांवर कारवाई देखील केली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट ठाऊक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

निरीक्षण शुल्क :

तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्या प्रॉपर्टी ते संपूर्ण निरीक्षण केले जाते. यामध्ये बँकेकडून काही विशेषतज्ञ येतात आणि लेआउट अप्रूव्हल, वैधानिक अप्रूव्हल, कन्स्ट्रक्शन मानदंड यांसारख्या बऱ्याच गोष्टींवर संपत्तीचे मूल्यांकन केले जाते. ही सर्व प्रोसेस निरीक्षण शुल्क अंतर्गत करण्यात येते. ज्यामध्ये बऱ्याच बँका निरीक्षण शुल्क प्रोसेसिंग फीमध्ये ऍड करतात तर, काही बँका अधिक पैसे वसूलण्यासाठी निरीक्षण शुल्क म्हणून एक्स्ट्रा चार्जेस लावतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan EMI 02 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan EMI(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x