
Home Loan EMI | गृहकर्ज घेताना ज्यावेळी सर्वसामान्य व्यक्तीचा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा, कमीत कमी पगारात आपल्याला आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी गृहकर्ज मिळेल का असा प्रश्न बऱ्याच व्यक्तींच्या मनात निर्माण होत असतो. एवढेच नाही तर, अगदी कमी पगाराच्या नोकरीतून आपल्याला किती लाखांचे गृहकर्ज मिळू शकते, परतफेडीचा कालावधी किती असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या बातमीपत्रातून जाणून घेणार आहोत.
कमीत कमी पगारातून घराची स्वप्नपूर्ती साकार होते का :
सध्या चाळीमधील घरांपासून ते मोठमोठ्या इमारतीच्या फ्लॅट घरांपर्यंतच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तरीसुद्धा आयुष्यातली सर्वात मोठी सेविंग ही सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा इतर कोणताही व्यक्ती असो तो आपली मोठी इन्व्हेस्टमेंट घरामध्ये करतो. तुम्हाला कमीत कमी म्हणजे केवळ 20,000 रुपयांच्या पगाराची नोकरी असेल तरीसुद्धा तुमचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. यासाठी तुम्हाला तुमच्या बजेटनुसार आणि परिस्थितीनुसार घराची निवड करावी लागेल.
गृहकर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोर महत्त्वाचा :
ज्यावेळी प्रश्न गृहकर्ज घेण्याचा येतो तेव्हा कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था आपल्याला किती लाखांचे कर्ज देऊ शकते ही बाब समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला मिळणारे कर्ज हे पूर्णतः तुमच्या मागील क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित असते. तुम्ही वेळेवर आधी घेतलेल्या कर्जाची परतफेड व्यवस्थितपणे आणि वेळोवेळी करत आहात की नाही या गोष्टीच्या आधारे तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे सर्वस्वी बँक ठरवते.
किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल :
समजा एखाद्या व्यक्तीला 20000 रुपये मासिक पगार आहे. बँका त्याचबरोबर वित्तीय संस्था कर्जदाराला त्याच्या पगाराच्या 50 ते 60% रक्कम EMI साठी बाजूला काढण्यात सांगतात.
जर 20000 पगार असेल तर, तुम्हाला 10000 ते 12000 रुपयांपर्यंत मासिक EMI भरावा लागू शकतो. जो व्यक्ती 20000 रुपयांच्या पगारातून 10 किंवा 12 हजारो रुपयांचे मासिक हप्ते भरण्यास सक्षम असतो त्याला बँक गृहकर्जासाठी 10 ते 15 लाख रुपयांचे होम लोन प्रदान करते. कर्जदाराला फेडावी लागणारी रक्कम ही व्याजदरानुसार बदलू देखील शकते.
10 लाखांचे गृहकर्ज घेतल्यानंतर कितीचा हप्ता बसतो :
समजा एखादा व्यक्ती 10 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेत असेल तर, त्याला 8 ते 9000 रुपयांचा EMI भरावा लागू शकतो. हा इएमआय 8% व्याजदराने उपलब्ध केला जातो.
15 लाखांचे गृहकर्ज घेतल्यानंतर कितीचा हप्ता बसतो :
समजा त्या व्यक्तीला आणखीन 5 लाख रुपये वाढवून म्हणजेच 10 ऐवजी 15 लाख रुपयांचे गृहकर्ज हवं असल्यास 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8.5% व्याज दराने गृहकर्ज देण्यात येते. म्हणजेच कर्जदाराला 15,000 किंवा कमीत कमी 12,000 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.