 
						Home Loan Vs SIP | स्वतःच घर खरेदी करता यावं यासाठी अनेक व्यक्ती जीवाचं रान करतात. काहीजण आयुष्याची जमापुंजी खर्च करून राहण्यासाठी रूम घेतात तर, काही व्यक्ती बँकेकडून कर्ज घेऊन देखील घराची स्वप्नपूर्ती साकार करतात. त्याचबरोबर त्वरित कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च न करता आणि कर्जाच्या विळख्यात न पडता देखील तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करून घर खरेदी करू शकता.
घर खरेदी करताना दुप्पटीने पैसे खर्च होतात :
आपण एका उदाहरणावरून तुमचे कशा पद्धतीने जास्तीचे पैसे खर्च होऊ शकतात हे पाहणार आहोत. समजा एखाद्या व्यक्तीने बँकेकडून होम लोनकरिता 20 लाख रुपयांची रक्कम उचलली असेल आणि त्याचे व्याजदर आपण 9 % आहे असं समजूया. अशातच तुम्ही 20 लाख रुपयांची मोठी रक्कम 20 वर्षांमध्ये फेडण्याची ठरवली तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला साधारणपणे 17995 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
20 लाखांच्या कर्जात 20 वर्षांत तुमचे केवळ व्याजाचे 23,18,685 रुपये द्यावे लागतील. म्हणजे एकूण वीस वर्षानंतर तुम्हाला बँकेला एकूण रक्कम 43 लाख 18 हजार 685 रुपये द्यावी लागेल. म्हणजेच तुमचे जास्त पैसे व्याजाला जात आहेत परंतु तुम्ही एक नवीन शक्कल लढवून बँकेच्या जास्तीच्या व्याजापासून वाचू शकता.
हा सोपा फॉर्म्युला वापरून घराचं स्वप्न करता येईल साकार :
20 लाख रुपयांचे घर खरेदी करण्याऐवजी तुम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा वापर केला पाहिजे. यामध्ये तुम्ही 20 वर्षांची एसआयपी करून भरपूर मोठा फंड तयार करू शकता. समजा तुम्ही 20 वर्षांसाठी प्रतिमहा 18,000 हजार रुपये यांची गुंतवणूक केली आणि 12 टक्क्यांच्या हिशोबाने गुंतवणुकीचे 20 वर्षे पूर्ण झाले तर, तुम्हाला 43 लाख 20 हजार एवढी मोठी रक्कम मिळेल.
यामध्ये तुम्ही आलिशान घर खरेदी करू शकता. कारण की भविष्यात साध्या घरांच्या किंमती देखील गगनाला भिडतील. फायद्याची गोष्ट म्हणजे तुम्हाला या गुंतवणुकीवर व्याजाचे 1 कोटी 36 लाख 64 हजार 663 रुपये मिळतील. म्हणजेच 20 वर्षानंतर केवळ 18 हजारांच्या एसआयपी वरून तुम्ही 1 कोटी 79 लाख 84 हजार 663 रुपये मिळवाल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		