
Home on Rent | आपल्यापैकी बऱ्याच सर्वसामान्य व्यक्ती भाड्याने घर घेऊन राहणं पसंत करतात. कारण की, कमी वेतन असल्यामुळे प्रत्येकालाच स्वतःच घर घेणं परवडत नाही. त्याचबरोबर सध्याच्या घडीला घर, मालमत्ता आणि जमिनीच्या किमती गगनाला भिडले आहेत. त्याऐवजी भाड्याने एखादी रूम घेऊन राहणे व्यक्तींना सोयीचे वाटते.
घर भाड्याने घेण्याआधी तुमच्यामध्ये आणि मालकामध्ये भाडेकरार होतो. या करारावर म्हणजेच एग्रीमेंटवर घराच्या भाड्याच्या पैशांबाबत सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतात. परंतु काही चुकांमुळे तुमच्यात आणि मालकात चांगलीच भांडण पेटू शकतात. तुम्ही सुद्धा घर भाड्याने घेण्याचा विचार करत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवा.
1) घराचं रेंट :
भाड्याचं घर घेऊन राहताना घराची रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. तुम्हाला मालकाकडून जेवढी रक्कम सांगण्यात आली तेवढीच रक्कम रूम ऍग्रीमेंटवर आहे की नाही याची जाचपडताळणी करा. नाहीतर तुम्ही गोत्यात येऊ शकता.
2) प्रतिबंधाची माहिती :
रेंट एग्रीमेंटवर तुम्ही तुमच्या घराच्या प्रतिबंधाची सर्व माहिती नमूद केली पाहिजे. बरेच भाडेकरू भाड्याने रूम घेऊन स्वतः ती रूमा आतमधून रिन्यूव करण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या व्यक्तीला भाडेकरू करतात. परंतु मालकाकडून या सर्व गोष्टींना प्रतिबंध असेल तर भाडेकरू हे करू शकत नाही.
3) प्रॉपर्टीचा वापर :
रेंट एग्रीमेंट बनवताना तुम्ही भाड्याने घेतलेली प्रॉपर्टी कोणत्या कामासाठी घेत आहात ही गोष्ट एग्रीमेंटवर लिहिणे गरजेचे आहे. तुम्ही भाड्याने घेतलेली प्रॉपर्टी एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी वापरत असाल तर, एग्रीमेंटवर नमूद करा. नाहीतर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरे जावे लागेल.
4) रेंट एग्रीमेंट बनवण्याचा खर्च :
रेंट एग्रीमेंट बनवण्याचा खर्च नेमकं कोण करणार याचे चर्चा आधीच करून घ्या. बऱ्याचदा लँडलॉर्ड रेंट एग्रीमेंटचा खर्च देतात परंतु, काही वेळा भाडेकरूकडून रेड एग्रीमेंटचा खर्च घेतला जातो.
5) भाड्यामध्ये वाढ आणि रिन्यूअल :
रेंड कधी रिन्यू होणार हे रेंट एग्रीमेंटमध्ये नमूद केलेले असावे. त्याचबरोबर रिन्यू करताना रेंट मध्ये वाढ केली जाणार आहे की नाही, जर वाढ केली तर किती वाढ केली जाणाऱ्या सर्व गोष्टी नमूद केल्या पाहिजे.
6) घरामधील सुविधांची संपूर्ण लिस्ट :
प्रत्येक मालकाने आणि भाडेकरूने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, रेंट एग्रीमेंट करताना घरामधील संपूर्ण सुविधांची लिस्ट नमूद करावी. समजा तुम्ही भाड्याने घेतलेल्या घरामध्ये दोन प्रकारचे बाथरूम आहेत आणि मालकाने एका बाथरूममध्ये गिझरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर ऐनवेळी मालक मी दोन्हीही बाथरूममध्ये गिझरची सुविधा दिली आहे असं बोलून तुमच्यावर आरोप घेऊ शकतो. त्यामुळे रेंट एग्रीमेंटवर सर्व काही नमूद करून घ्या.
7) सामान्य तोडफोड :
रेंटने म्हणजेच भाड्याने घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला छोटी मोठी तोडफोड माफ असते. परंतु मोठी तोडफोड केली तर भाडेकरूकडून भरपाई करून घेतली जाते या सर्व प्रकारची माहिती तुम्ही रेंट एग्रीमेंटमध्ये लिहिली पाहिजे.