11 December 2024 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

How To Apply for Income Certificate | उत्पन्नाचा दाखला कसा ऑनलाईन मिळवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How To Apply for Income Certificate in Maharashtra

How To Apply for Income Certificate | कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासठी आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे. उत्पन्नाच्या दाखल्यावर आपले वार्षिक उत्पन्न किती आहे याची माहिती देण्यात येते. शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी काही आर्थिक अटी देण्यात येतात. त्यामुळे आपण त्या अटीमध्ये बसत आहोत की नाही हे आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्यावरून समजते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. त्यामुळे आज या बातमीमधून उत्पन्नाचा दाखला नेमका कसा मिळवायचा याची माहिती जाणून घेऊ. (What is the validity of income certificate in Maharashtra?)

इथे मिळेल उत्पन्नाचा दाखला
उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी आपेल सरकार या पोर्टलवर सर्व माहिती देण्यात आली आहे. तुम्ही तेथून उत्पन्नाचा दाखला मिळवू शकता. यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेस्थळावर भेट द्या. तसेच ऑफलाईन पद्धतीने देखील उत्पन्नाचा दाखला मिळवता येतो. त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जावे लागेल. येथे सेतू केंद्रावर भेट दिल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळेल. (How can I get income certificate in Mumbai?)

हा दाखला मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

ओळखीचा पुरावा
उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तुमच्याकडे ओळखीचा पुरावा असायला हवा. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रोजगार हमी योजना कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारचे कागदपत्र असणे आवश्यक आहे. यातील कोणतेही एक ओळखपत्र म्हणून तुम्ही देऊ शकता. (What is the cost of income certificate in Maharashtra?)

पत्त्याचा पुरावा
आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, फोटो, पाणी बिल, वीज बिल, सातबारा, करपट्टीची पावती या पैकी कोणताही एक पुरावा तुम्ही येथे जमा करू शकता. अनेकदा घरामध्ये कोणी आजारी असेल. त्या व्यक्तीच्या आजपनसाठी मोठ्या ऑपरेशनची आणि जास्त पैशांची गरज असल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. यामध्ये तुम्हाला वैद्यकीय खर्चात मदत केली जाते.

स्वयंघोषणापत्र
उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी स्वयंघोषणापत्र देखील द्यावे लागते. हे पत्र तुम्ही तुमच्या आर्जासह जोडून द्यायला हवे. तुमचे उत्पन्न दाखवण्यासाठी आणखीन काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामध्ये प्राप्ती कर परतावा भरल्याचे प्रमाणपत्र, नोकरदार वर्गासाठी फॉर्म नंबर 16 ( शासकीय), शेतकरी व्यक्तीस सातबारा किंवा 8 अ, पेंशनधारक व्यक्तींसाठी बँकेचे प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अथवा आपले सरकार या वेबसाईटवर जा. तिथे पुढे तुम्हाला तुमचे लॉगिन तयार करावे लागेल. यासाठी आधी तुमचे नाव, आयडी, पावर्ड तयार करून घ्या. पुढे महसूल विभाग निवडून त्यात तुमचे लॉगइन करून घ्या. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला या पर्यायावर तुम्ही क्लिक करा.

पुढे येथे तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती विचारली जाईल. ती सर्व माहिती त्यात सादर करा. यामध्ये तुम्ही जी काही प्रमाणात जोडणार आहात ती स्कॅन करून घ्यावीत. त्याची साईज 75 केबी ते 500 केबी इतकी असावी. यामध्ये तुम्हाला फोटो, सही अशा सर्व गोष्टी ओपलोड कराव्या लागतील. पुढे यासाठी जे शुक्ल दाखवले जाईल ते देखील ऑनलाईन पद्धतीने भरावे. यावेळी तुम्हाला जी पावती मिळेल ती सेव करून ठेवणे गरजेचे आहे.

किती दिवसात मिळेल दाखला?
उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीमध्ये अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळतो. जर तुम्हाला 15 दिवसात हा दाखला मिळाला नाही तर तुम्ही पुन्हा एकदा अपील अर्ज सादर करावा. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला मिळवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How To Apply for Income Certificate in Maharashtra check details on 06 May 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x