
Income Tax Notice | लग्न समारंभ आणि इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी मोठी खरेदी करणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागबारीक नजर ठेवून आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरेदी करताना कर टाळण्यासाठी अनेक जण अनेक पॅन कार्डचा वापर करत आहेत. यामुळे सरकारच्या महसुलाचे नुकसान होत आहे. अशी अनेक प्रकरणे विभागासमोर आली असून त्यांना नोटिसा पाठविण्याची तयारी सुरू आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्यांवर लक्ष
कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या अनेक जण कर भरण्यापासून वाचण्यासाठी दोन लाखरुपयांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी ऑनलाइन पेमेंटऐवजी रोख रक्कम देण्यास प्राधान्य देतात. इतकंच नाही तर लग्न समारंभात हॉटेल आणि बँक्वेट हॉलचं बिल भरताना ते जवळच्या नातेवाईकांच्या पॅन कार्डचाही वापर करतात. या पार्श् वभूमीवर लक्झरी आणि ब्रँडेड वस्तूंची विक्री करणारी हॉटेल्स, बँक्वेट हॉल आणि शॉपिंग मॉलमध्ये प्राप्तिकर विभागाने आपली चौकशी तीव्र केली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्यांवर विभागलक्ष ठेवून आहे.
विक्रेत्याला फॉर्म भरावा लागणार:
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या निर्णयानुसार आता विक्रेत्याला दोन लाख रुपयांपेक्षा अधिक विक्री किंवा सेवा शुल्क घेताना एक फॉर्म भरावा लागणार आहे. यामध्ये खरेदी-विक्रीसंदर्भातील सर्व माहिती द्यावी लागणार आहे. तसेच खरेदीदाराचा संपूर्ण तपशीलही यात समाविष्ट करण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त पॅन कार्ड टाकले तर त्याची माहितीही त्यात नोंदवली जाईल.
फसवणुकीला आळा बसेल :
या निर्णयामुळे महागड्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या स्त्रोतांचे डेटा विश्लेषण करणे सोपे होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेकदा दोन लाखरुपयांपेक्षा जास्त बिल आल्यास ग्राहक बिलाची दोन भागात विभागणी करण्याची विनंती करतात, पण आता ते तसे करू शकणार नाहीत.
प्राप्तिकराच्या किती प्रकारच्या नोटिसा
१. कलम १४३(१) अन्वये –
या कलमांतर्गत विवरणपत्रे यशस्वीरित्या भरल्याची माहिती पाठविली जाते. त्यात थकित कर किंवा परताव्याची माहिती दिली जाते.
2. कलम 143 (2) अन्वये –
रिटर्नमध्ये काही विसंगती आढळल्यास ही नोटीस येते. करदात्याने उत्पन्न कमी केल्यास किंवा जास्त तोटा झाल्यास किंवा कमी कर भरल्यास विभाग चौकशी करतो. करदात्याकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते.
3. कलम 148 अन्वये –
करदात्याने आपले प्रत्यक्ष उत्पन्न योग्य रितीने जाहीर केले नसेल तर त्याचे मूल्यमापन करण्यासाठी ही नोटीस पाठविली जाते. कर अधिकारी अनेक पातळ्यांवर उत्पन्नाचे मूल्यमापन करू शकतो.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.